गंगापूरछत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील पालखेडचे चार युवक गोदावरीत बुडाले ! कायगाव टोकेत चौघांना वाचवण्यासाठी मच्छिमारांनी पात्रात उड्या टाकल्या पण…!!

पाण्याचा अंदाज न आल्याने मिळाली जलसमाधी

Story Highlights
  • सुरुवातीला एक जण बुडाला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा आणि त्यानंतर दोघे अशा चौघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – कायगाव टोके (तालुका गंगापूर) येथील सिध्देश्वर मंदिराजवळ गोदावरी पात्रात चार युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवार ११ मार्च रोजी दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, चौघांचे मृतदेह गोदापात्रा बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना समजताच गोदापात्रातील मच्छिमारांनी गोदापात्रात उड्या टाकल्या परंतू तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (20), आकाश भागिनाथ गोरे (20) व शंकर पारसनाथ घोडके (22) अशी मृतांची नावे आहेत. हे चारही युवक वैजापूर तालुक्यातील पालखेडचे आहेत. या दुर्देवी घटनेमुळे वैजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

यासंदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील मढीच्या यात्रेला दरवर्षी पालखेड येथून दिंडी जाते. या दिंडीसोबत बाबासाहेब अशोक गोरे, नागेश दिलीप गोरे, आकाश भागिनाथ गोरे व शंकर पारसनाथ घोडके हे चारही युवक गावातून निघाले. कायगाव टोके येथे ते पोहोचले. तेथे गोदावरी नदीजवळ कावडी घेवून श्री सिद्धेश्वर मंदिराकडे गेले. मंदिराच्या पाठीमागील गोदापात्रातील घाटावर आंघोळ व पोहोण्यासाठी ते उतरले.

पाण्याचा अंदाज न आल्याने चोघेही गोदावरीत बुडाले. सुरुवातीला एक जण पाण्यात बुडाला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरा आणि त्यानंतर पुन्हा दोघे अशा चौघांना गोदावरीत जलसमाधी मिळाली. ही माहिती वार्याच्या वेगाने वैजापूरसह जिल्ह्यात पोहोचली. परिसरातील नागरिक धावून आले. गोदापात्रातील मच्छिमारही मदतीसाठी आले. त्यानंतर एनडीआरएफची टीम प्रशासनही तत्परतेने दाखल झाले. मात्र, चौघांचा जीव वाचू शकला नाही. सायंकाळपर्यंत चौघांचे मृतदेह गोदापात्रातून बाहेर काढण्यात यश मिळाले.

Back to top button
error: Content is protected !!