छत्रपती संभाजीनगर
Trending

तू मला खूप आवडतेस… माझ्याशी लग्न कर नाहीतर तमाशा करण्याची धमकी देऊन केला विनयभंग !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – तू मला खूप आवडतेस… माझ्याशी लग्न कर नाहीतर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करण्याची व तमाशा करण्याची धमकी देऊन महिलेचा विनयभंग केला. चिकलठाणा कामगार कॉलनी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर परिसरात हा प्रकार घडला.

श्रीधर मुनीधर बाबा ( वय 50, रा. चिकलठाणा बाजाराची कमान, चिकलठाणा, छत्रपती सांभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

महिला फिर्यादी या त्यांच्या राहत्या घरून दुकानात जाण्यासाठी पायी जात होत्या. आरोपी श्रीधर मुनीधर बाबा हे त्यांच्या पाठीमागे येऊन चिकलठाणा कामगार कॉलनी समोर जालना रोड येथे आले असता फिर्यादीला म्हणाले की “तू माझा फोन का उचलत नाही. तू मला खुप आवडतेस तू माझ्याशी लग्न कर” तू लग्न नाही केले तर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करील असे धमकावले.

यावर महिला फिर्यादीने आरोपीला “तू असा का म्हणतोस” असे म्हणाले असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. मी तमाशा करेल” अशी धमकीही दिली. महिला फिर्यादीस अश्लिल शिविगाळ करून विनयभंग केला.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून श्रीधर मुनीधर बाबा ( वय 50, रा. चिकलठाणा बाजाराची कमान, चिकलठाणा, छत्रपती सांभाजीनगर) यांच्यावर एम सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि तुपे हे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!