छत्रपती संभाजीनगर
Trending

माझ्या साहेबाला गावरान आंबे खूप आवडतात, तू आंब्याचे टोपले घेऊन माझ्या गाडीवर बस ! मी तुला साहेबांकडे झाल्टा फाट्याजवळ घेऊन जातो… पहा पुढे काय घडले !!

चोरीचा नवा प्रकार, रस्त्यावरील विक्रेत्यांनी अशा चोरट्यांपासून सावध रहावे

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – माझ्या साहेबाला गावरान आंबे खूप आवडतात, ते टोपलीतले सर्व आंबे विकत घेतील. तू आंब्याचे टोपले घेऊन माझ्या गाडीवर बस. असे म्हणताच आंबे विक्री करणारी महिलाही त्याच्यावर विश्वास ठेवून आंब्याच्या टोपल्यासह गाडीवर बसली. पुढे झाल्टा फाट्याजवळ सदर महिलेने त्याला गाडी थांबवण्यास सांगितले मात्र त्याने ती गाडी तशीच दामटली आणि पुढे जाऊन त्या महिलेच्या अंगावरील दागिने लुटले. जर कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकीन अशी धमकीही त्याने जाता जाता दिली. ही घटना सायंकाळी ४.४५ ते ५.३० वाजेदरम्यान टाकळी पेट्रोलपंपापासून आतील कच्च्या रस्त्याने एमआयडीसी शेंद्रा भागात घडली.

यातील फिर्यादी महिला आंबे एका टोपल्यात घेऊन विक्री करण्यासाठी थांबलेली होती. यावेळी आरोपी महिला फिर्यादीस म्हणाला की “माझ्या साहेबाला गावरान आंबे खुप आवडतात, तू आंब्याचे टोपले घेऊन माझ्या गाडीवर बस, मी तुला साहेबांकडे झाल्टा पाटीजवळ घेऊन जातो, ते तुझे सगळे आंबे घेतील”.

आरोपीच्या या बोलण्यावर फिर्यादी महिलेने विश्वास ठेवला व आंबे ठेवलेले टोपले सोबत घेऊन त्याच्या गाडीवर बसली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस झाल्टा फाटा येथे नेल्यावर फिर्यादीने त्यास थांब म्हणाले असता त्याने न थांबता पुढे घेऊन गेला. अचानक फिर्यादीस चल गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील टाप्स व हातातील चांदीच्या पाटल्या काढ नाहीतर तुला जीवे मारून टाकीन” अशी धमकी दिली.

सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जबरीने चोरून नेली. या चोरीबद्दल कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांना जीवे मारून टाकीन अशी धमकीही त्याने जाता जाता दिली. सोन्या चांदिचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ८९००० रुपयांचा ऐवज त्याने चोरला.

याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्यावर एम सिडको पोलिस स्टेशनमध्ये कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शिवाजी चौरे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!