महाकृषी ऊर्जा अभियान : शेतकऱ्यांनो त्वरा करा, मार्च अखेरपर्यंत 30 टक्के वीजबिल माफीची संधी !
थकबाकीदार कृषीपंप धारक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
- 23 दिवसांत परिमंडळातील 1 हजार 848 शेतकऱ्यांनी चालू बिलांचा 87 लाखांचा केला भरणा
नांदेड दि. 23 जानेवारी 2023 विलंब आकार आणि व्याजातील सुट दिल्यानंतर सुधारीत थकबाकीनुसार 30 टक्के माफीचा लाभ घेण्यासाठी आता मार्च 2023 अखेर पर्यंतचाच कालावधी शिल्लक राहीला आहे. शाश्वत सिंचनाच्या स्वप्नपुर्तीसोबतच कृषी आकस्मिक निधीच्या माध्यमातून आपल्या गावातील वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांनी कृषी वीज जोडणी धोरणाचा लाभ घेत थकीत बीलासह चालू वीजबील भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरण कडून कृषीपंपांच्या थबाकीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी मार्च 2021 पासून कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 राबविले जात आहे. त्यानुसार गेल्या तेवीस दिवसात नांदेड परिमंडळातील 1 हजार 848 कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी 86 लाख 88 हजार रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये नांदेड जिल्हयातील 943 शेतकऱ्यांनी 46 लाख 8 हजार रूपयांचे वीजबील भरले आहे. तर परभणी जिल्हयातील 535 शेतकऱ्यांनी 23 लाख 34 हजार रूपयांचा भरणा केला आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्हयातील 370 शेतकऱ्यांनी 17 लाख 45 हजार रूपयांचा भरणा केला आहे.
महाकृषीऊर्जा अभियानाच्या माध्यमातून आज पर्यंत नांदेड परिमंडळातील 4 हजार 246 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांनी मार्च 2022 पर्यंत थकबाकी भरल्यामुळे 50 टक्के माफीचा फायदा घेत तब्बल 10 कोटी 59 लाख रूपयांची सुट मीळवली आहे. या मध्ये नांदेड जिल्हयातील भोकर विभागातील 732 शेतकरी, देगलूर विभागातील 282 शेतकरी, नांदेड शहर विभागातील 284 शेतकरी तर नांदेड ग्रामीण विभागातील 912 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. त्याचबरोबर परभणी विभाग क्रमांक एक मधील 442 शेतकरी तर विभाग क्रमांक दोन मधील 653 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.
हिंगोली जिल्हयातील 941 शेतकऱ्यांनी शंभर टक्के थकबाकी भरत वीजबील कोरे केले आहे. आज रोजी नांदेड परिमंडळातील 3 लाख 6 हजार 453 शेतकऱ्यांकडे सप्टेंबर 2020 रोजी 4 हजार 206 कोटी 36 लाख रूपयांची थकबाकी होती. यामध्ये विलंब आकार व व्याजामध्ये सुट देवून निर्लेखनानंतर 2 हजार 494 कोटींची थकबाकी झालेली आहे. या धोरणाचा लाभ घेत परिमंडळातील 1 लाख् 54 हजार 11 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत थकबाकी व चालू बीलांपोटी 131 कोटी 24 लाख रूपयांचा भरणा केला आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे या धोरणातील विविध योजनांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी सातत्याने आढावा घेत असून या अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने कार्यरत रहावे असे निर्देश दिले आहेत. कृषीपंप वीज जोडणी धोरणाच्या माध्यमातून वीजबिलांच्या वसुलीतून प्राप्त झालेला ६६ टक्के आकस्मिक निधी हा प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जमा झालेला निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेचे पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe