छत्रपती संभाजीनगर
Trending

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या पतसंस्थेची सभा रविवारी !

संभाजीनगर लाईव्ह, दि. 5 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या पतसंस्थेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 9 जुलै 2023 रोजी (रविवारी) आमखास मैदानाच्या बाजूला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे.

या सभेस पतसंस्थेचे अध्यक्ष अनंत कोंत, सचिव ‍दिलीप पवार, कोषाध्यक्ष हणमंत गायकवाड, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बागुल, सरचिटणीस संजय खाडे, केंद्रीय सल्लागार गुलाबराव मानेकर केंद्रीय कार्यकारीणी, संचालक मंडळ तसेच सर्व परिमंडल अध्यक्ष व सचिव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सभेस छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील पतसंस्थेच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे उपसरचिटणीस प्रणेश सिरसाठ, परिमंडल अध्यक्ष सुनील पावडे व सचिव गणेश बोढरे यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!