महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर ! अध्यक्षपदी सुनील पावडे, उपाध्यक्षपदी रमेश सोनवणे तर सचिवपदी नितीन पारिपेल्ली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि 12 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेची औरंगाबाद परिमंडळ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सुनील पावडे, उपाध्यक्षपदी रमेश सोनवणे व सचिवपदी नितीन पारिपेल्ली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
परिमंडळ कार्यालय स्तरावर सभासदांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध प्रलंबित प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याकरिता नुकतीच औरंगाबाद परिमंडळ स्तरावर बैठक झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बागुल, उपसरचिटणीस प्रणेश शिरसाट व पतसंस्था सचिव दिलीप पवार यांच्या उपस्थितीत विचारविनिमय करून सर्वानुमते औरंगाबाद परिमंडळ कार्यालय स्तरावर २०२३-२४ साठी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : कोषाध्यक्ष- पंकज उदावंत, कार्याध्यक्ष- विलास म्हस्के, चेतन वाघ, विशाल कासलीवाल, महिला प्रतिनिधी- कांचन राजवाडे, शिल्पा काबरा, संघटन सचिव-सागर चव्हाण,गणेश बोडरे, शत्रुघ्न फुके, सहसचिव- नितीन पाडसवान, नरेश प्रसाद, शिवाजी तिकांडे, सल्लागार- राजेश डोणगावकर, विश्वास पाटील, कार्यकारिणी सदस्य – राहुल शंभरकर, सुहास बोंडे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe