महाराष्ट्र
Trending

बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्या ५५ लोकांची ओळख पटली ! जिवंत जाळण्याचा प्रयत्न, ३०७ कलमानुसार गुन्हे दाखल करणार: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – काल बीडमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरांसह जाळपोळ करणार्या जवळपास ५० ते ५५ लोकांची ओळख पटली आहे. यासंदर्भातील सगळे व्हिडियो फुटेज मिळालेले आहेत. उर्वरित लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पोलिस ३०७ कलमानुसार जीवे मारण्याचा प्रयत्न यानुसार कारवाई करणार आहे. अशा प्रकारे कुणाला मारून टाकण्याचा प्रयत्न प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न हा जर होत असेल तर मला असं वाटतं पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत, अशा कडक शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचार करणार्या आंदोलकांना सुनावलं. संदर्भात दुर्देवाने ज्यावेळेस अशा घटना घडत होत्या त्यावेळी काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते देखील त्याच्यामध्ये सामिल असल्याचं देखील लक्षात येतंय. त्याचे व्हिडियो फुटेज पाहून खात्रीकरून त्याची माहिती देण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात जे काही आंदोलन चाललेलं आहे त्या संदर्भात राज्य सरकार सकारत्मकतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री यांनी स्वतहा आरक्षणाच्या संदर्भातील कमीटमेंट दिलेलं आहे. त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे. यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळातील निर्णय देखील संबंधीत मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी ते पुन्हा सांगणार नाही. पण याचवेळी काही लोकं या आंदोलनाचा फायदा घेवून हिंसा करण्याचा प्रयत्न करताय. विशेषत ज्या प्रकारे काल बीडमध्ये काही लोकांनी लोकप्रतिधींचे घरं जाळ, काही विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट कर, काही लोकांचे हॉटेल, दवाखाने जाळ, प्रतिष्ठानं जाळ अशा प्रकारची जी कारवाई केली आहे ही कारवाई अत्यंत चुकीची आहे. त्याची अतिशय गांभीर्याने दखल ही राज्य सरकारने घेतली आहे. अशा सर्व लोकांवर पोलिस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल.

विशेषत: लोकं घरात असताना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्याचे सगळे व्हिडियो फुटेज मिळालेले आहेत. ५० ते ५५ लोकांची ओळख पटली आहे. उर्वरित लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पोलिस ३०७ कलमानुसार जीवे मारण्याचा प्रयत्न यानुसार कारवाई करणार आहे. अशा प्रकारे कुणाला मारून टाकण्याचा प्रयत्न प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न हा जर होत असेल तर मला असं वाटतं पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई यासंदर्भात करण्यात येणार आहे.

जिथे शांततापूर्ण आंदोलनं चाललेली आहेत त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. शांततापूर्ण आंदोलनं करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांचं म्हणनं ऐकून घेतलं जाईल. मात्र, हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही. यासंदर्भात आवश्यकतेप्रमाणे अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. या फोर्सेस ठिकठिकाणी आहेत. जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत पोलिस कारवाई सुरु राहिल. यासंदर्भात दुर्देवाने ज्यावेळेस अशा घटना घडत होत्या त्यावेळी काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते देखील त्याच्यामध्ये सामिल असल्याचं देखील लक्षात येतंय. त्याचे व्हिडियो फुटेज पाहून खात्रीकरून त्याची माहिती देण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!