महाराष्ट्र
Trending

पूर्णवादी बँकेवर दगडफेक ! बीड जिल्ह्यात आंदोलकांमधील 10 अनोळखी लोकांनी मुख्य जमावातून बाहेर पडून केला दगडाचा मारा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाच्या मंडपात घुसून पोलिसांनी केल्या अमानुष लाठी चार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पडसाद उमटलेले असतानाच बीड जिल्हाही याला अपवाद ठरला नाही. मुळात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये मराठा आंदोलक शांततेज जमा झाले होते. मात्र, आंदोलकांमधील 10 ते 15 अनोळखी लोकांनी मुख्य जमावातून बाहेर पडून पूर्णवादी बॅंक, सुखसागर हॉटेल व बसस्टॅंडमधील उभा असलेल्या बसच्या समोरील काचावर दगडफेक केली. मराठा समाजाच्या आंदोलनास गालबोट लावणारे ते १० ते १५ अनोळखी लोक कोण आहेत, याचा शोध माजलगाव पोलिस घेत आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई शाहू दत्ता मंदे (पोलीस ठाणे माजलगाव शहर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 01/09/2023 रोजी जालना जिल्हा अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आदोलना दरम्यान लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ दिनांक 02/09/2023 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक दिली होती.

या अ नुषंगाने सर्व सोशल मीडियावरून बीड बंद करण्याची हाक दिल्याची माहिती प्रसारित होत होती. यासाठी बंदोबस्त नेमण्यात आलेला होता. बंदोबस्तावर पोलिस शिपाई शाहू दत्ता मंदे यांच्यासह पोलिस स्टाफची नेमणुक करण्यात आली होती. बंदच्या अनुषंगाने माजलगाव शहर व परिसरातूम मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले. सकाळी 10.00 ते 13.00 वाजे दरम्यान जमाव जमला. तालुका दंडाधिकारी व पोलिसांच्या वतीने जमावास पांगण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याच दरम्यान, जमावातील अंदाजे 10 ते 15 अनोळखी लोकांनी मुख्य जमावातून बाहेर पडून सुरुवातीला सुखसागर हॉटेलवर दगडफेक केली. नंतर पुढे पूर्णवादी बँकेवर दगडफेक करण्यात आली. दोन्ही ठिकाणी नुकसान करण्यात आली. तसेच बसस्थानक समोर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि नंतर काही अनओळखी लोकानी बस डेपो मध्ये उभ्या असलेल्या बसवर समोरील काचावर दगडफेक केली.

याप्रकरणी पोलिस शिपाई शाहू दत्ता मंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव पोलिस स्टेशनमध्ये १० ते १५ अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!