छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा वणवा गावागावांत पेटला ! फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक, सरपंच पदाचा राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकणार, गावासोबत अन्नत्याग उपोषण करणार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या उपोषणाच्या मंडपात घुसून पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या निषेधार्थ व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहे. अंतरवाली सराटी येथे बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत असल्याने पुढील ४८ तासांत शासनाने निर्णय न घेतल्यास सरपंच पदाचा राजीनामा देवून गावासोबत अन्नत्याग उपोषणास बसण्याचा इशारा फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी संभाजीनगर लाईव्हशी बोलताना दिला.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या उपोषणाच्या मंडपात घुसून पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या निषेधार्थ काल छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील सुमारे ११ जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. हा बंद शांततेच्या मार्गाने करण्यात आला. मराठा मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी रास्ता रोको करून गृहमंत्रालयाचा निषेध नोंदवण्यात आला.

दरम्यान, वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओळखले जाणारे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी कालच आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. साबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनाची सुरुवात टरबूज फोडून करण्यात आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्री काढण्यात आली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले असून सरकार आणि आंदोलक यात केवळ चर्चा झडत असून ठोस निर्णय घेतला जात नाही. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस असून जोपर्यंत अध्यादेश काढला जात नाही तोपर्यंत उपोषणातून माघार नाही. दरम्यान, सरकारचे प्रतिनिधी मंत्री गिरीष महाजन यांनी इतक्या तातडीने अध्यादेश काढता येणान नसल्याचे प्रसारमाध्यमांना स्पष्ट केले आहे. इकडे मनोज जरांगे पाटील यांनी कालच सरकारला पाणी त्याग करण्याचा इशारा दिला होता.

एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न आता संपूर्ण राज्यात पेटला असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी सरकारला इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत असल्याने पुढील ४८ तासांत शासनाने निर्णय न घेतल्यास सरपंच पदाचा राजीनामा देवून गावासोबत अन्नत्याग उपोषणास बसण्याचा इशारा फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी दिला आहे.

फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्यावर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंनी स्वत:ची कार पेटवून मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा काल केला होता निषेध – विहिर अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश करून पंचायत समिती कार्यालयासमोर नोटांची उधळन करून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी काल, ३ सप्टेंबर रोजी वेगळे आंदोलन करून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न करता त्यांनी स्वतहाच्याच कारला इंधन ओतून पेटवून दिले. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आजही त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलना टरबूज फोडून प्रतिकात्मक तिरडी आंदोलन काढण्यात आले. दरम्यान, आता त्यांनी या आरक्षणाच्या लढाईला आर पारचे स्वरूप दिले असून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. यापुढे जावून अन्नत्याग आंदोलनाचा अल्टिमेटमही त्यांनी सरकारला दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!