फुलंब्री
Trending

टरबूज फोडून काढली गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा ! फुलंब्रीत गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंचे अनोखे आंदोलन, दिला रक्तपाताचा इशारा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या उपोषणाच्या मंडपात घुसून पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या निषेधार्थ आज सकाळी फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखालील आदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधले. टरबूज फोडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांनी निषध नोंदवला. दरम्यान, यापुढे जर एकाही मराठा बांधवाला हात लावला, एकाही मराठा बांधवाच्या रक्ताचा थेंब या स्वराज्याच्या मातीत पडला तर रक्तपात झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही सरपंच मंगेश साबळे यांनी यावेळी सरकार व पोलिसांना दिला.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या उपोषणाच्या मंडपात घुसून पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्रातील सुमारे ११ जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला. हा बंद शांततेच्या मार्गाने करण्यात आला. मराठा मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी रास्ता रोको करून गृहमंत्रालयाचा निषेध नोंदवण्यात आला.

दरम्यान, फुलंब्रीत आज सकाळी १०. ३० वाजेच्या दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. सुमारे ५०० ते ६०० समर्थकांचा जमाव जमला होता. तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अतिशय शांततेत हे आंदोलन करण्यात आले. जळगाव – छत्रपती संभाजीनगर महामार्ग दुपारनंतर सुरुळीत सुरु झाला.

दरम्याना, वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओळखले जाणारे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी यावेळीही वेगळे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. साबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनाची सुरुवात टरबूज फोडून करण्यात आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्री काढण्यात आली.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी देवगिरी कारखान्यापासून ते फुलंब्री बसस्थानक या मार्गावर आंदोलन काढण्यात आले. नंतर या आंदोलनाची सांगता महात्मा फुले चौकात प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करून झाली. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सुरु झालेले हे आंदोलन सुमारे २ ते ३ तास सुरु होते. आंदोलकांनी कोणत्याही गाड्यांना नाहक अडवून त्रास दिला नाही. उलट गाड्यांना वाट मोकळी करून मानवतेचे दर्शन घडवले.

शेकडोंच्या संख्येना मराठा बांधव या मोर्चात दाखल झाले होते. मराठा आरक्षण तातडीने द्या, लाठी चार्ज करणार्या पोलिसांना तातडीने निलंबित करा यासह गृहमंत्री देवंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फुलंब्री पोलिसांनीही चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्यावर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळेंनी स्वत:ची कार पेटवून मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा काल केला होता निषेध – विहिर अनुदान घोटाळ्याचा पर्दाफाश करून पंचायत समिती कार्यालयासमोर नोटांची उधळन करून वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी काल, ३ सप्टेंबर रोजी वेगळे आंदोलन करून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न करता त्यांनी स्वतहाच्याच कारला इंधन ओतून पेटवून दिले. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आजही त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलना टरबूज फोडून प्रतिकात्मक तिरडी आंदोलन काढण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!