महाराष्ट्र
Trending

मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगेच्या सभेला लाखोंचा सुमदाय लोटला ! २५० एकवरील एक मराठा लाख मराठा घोषणेने महाराष्ट्र दुमदुमला !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक भव्य दिव्य अशी सभा आज दुपारी १२ वाजता होणार असून यासाठी कालपासून सभास्थळी लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांची अलोट गर्दी लोटली आहे. सभास्थळी सुमारे २५० एकरवर एक मराठा लाख मराठा या घोषणांनी संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमला आहे. दरम्यान, जरांगे पाटील सभेच्या स्थळी दाखल झाले असून लवकरच ते संबोधीत करणार आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबीच प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी जरांगे पाटलांची आहे.

१७ दिवस उपोषण आंदोलन केल्यानंतर संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्यातील उपोषणस्थळी अंतरवाली सराटी येथे आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असून मला ३० दिवसांचा कालावधी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते तथा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ३० दिवसांचा जो अवधी मागितला होता त्यास मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करून तूर्त उपोषण मागे घेतले होते.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला ३० दिवसांचा अल्टिमेटम आज १४ ऑक्टोबर रोजी संपत आहे. याशिवाय १० दिवसांचा अवधी वाढवून दिला होता. म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी अल्टिमेटमची मुदत संपत आहे. दरम्यान, आज ३० दिवस उलटले असून दुपारी १२ वाजता मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांना संबोधित करणार आहे. याशिवाय आता ते काय भूमीका घेणार, याकडे कोट्यवधी मराठा समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.

या सभेसाठी भव्य दिव्य असा स्टेज केलेला नाही. सभेचा स्टेज २० बाय ३६ या आकारात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या एंट्रीसाठी ६०० फुटांचा रॅंपची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे २५० एकरवर ही भव्य सभा आयोजिली आहे. लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याने १० हजार स्वयंसेवक कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात समाज बांधव येणार असल्याने मैदानात १० ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय ३५ कार्डियाक रुग्णवाहिका, १०० रुग्णवाहिका ,३०० डॉक्टर, ३०० नर्सिंग स्टाफ, अग्निशमक दलाच्या १० गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी २० एलईडी स्क्रिनही लावण्यात आल्या आहेत.

Back to top button
error: Content is protected !!