महाराष्ट्र
Trending

गोदापात्रात उद्या सामूहिक जलसमाधी आंदोलन ! पोलिसांच्या लाठी चार्जनंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक !!

मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करण्याची मागणी, जालन्याच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – जालन्यातील मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवन्यासाठी व मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या, ३ सप्टेंबर रोजी गादापात्रात सामूहिक जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले आहे. गोदावरी नदी पात्र, गुलमेश्वर मंदिर परिसर, गुळज (ता. गेवराई, जि. बीड) येथे हे सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असून त्यासंदर्भात गेवराईच्या तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

यासंदर्भात गेवराईच्या तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,  मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळण्या संदर्भात व मराठा समाजाचा ओ.बी.सी प्रवर्गात समावेश करून कुणबी जातीच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दि:- ०३/०८/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता गुळज पं. स. गण व परिसरातील सर्व गावाच्यावतीने गुळज येथील गोदापात्रात जलसमाथी आंदोलन व गुळज पं. स. गण. कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळवण्यासाठी व मराठवाड्यातील मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गात समाविष्ट करून सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी सुरु असलेले सराटी आंतरवाली (ता. अंबड, जि. जालना) येथील उपोषणास पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा गुळज गण व पंचक्रोशीतल मराठा समाजाच्या वतीने गुळज मालेगाव खु.बु, गुंतेगाव, पाथरवाला बु. खु, बोरगाव नवे जुने, बरड , सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, उमापूर या गावांतील समाज बांधव जल समाधी आंदोलन करणार आहे. दि. ०३/०९/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता गुळज येथील गोदावरी नदी पात्रात हे सामूहिक जलसमाधी आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे मराठा क्रांती मोर्चा (गुळज गण व पंचक्रोशी)ने कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!