महाराष्ट्र
Trending

पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, पुणे बंगरुळू महामार्गावर ९ किलोमीटर ट्रफिक जाम ! टायर जाळून संताप, नवले पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी !!

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – मराठा आरक्षण मागणीने संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरला असून पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी पुणे बंगरुळे महामार्गावर टायर जाळून संताप व्यक्त केला. महामार्ग रोखळ्यामुळे पुण्यातील नवले पुलावर दोन्ही बाजुंनी सुमारे ९ किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागल्या. दरम्यान, मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिका आणि स्कूल बसला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, सातारा मुंबई महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेवून ज्यांच्या कुणबींच्या नोंदी आढळल्या आहेत अशा मराठा बांधवांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, मराठा आणि कुणबी एकच आहेत. मिळालेले ११ हजार ५३० पुरावे हे सरसकट आरक्षण देण्यासाठी पुरेसे असल्याची मागणी करून आज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलक आक्रमक झाले.

राज्यभरात आज ठिकठिकाणी रास्तारोको करून टायर जाळून मराठा समाजाच्या आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. पुण्यातील नवले पुलावर व पुलाखाली मोठ्या प्रमाणत आंदोलक जमा झाले. सरकारविरोधात घोषणाबाजी करून त्यांनी तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळले. यामुळे पुणे बंगरुळू या महामार्गावर दोन्ही बाजुंनी सुमारे ९ किलोमीटर गाड्यांच्या रांगा लागून प्रचंड ट्रॅफिक जाम झाला.

सुमारे ५०० ते ७०० आंदोलकांनी हा रस्ता रोखून धरला. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिस त्यांना शांततेचे आवाहन करीत होते. दरम्यान, आंदोलकांनी रुग्णवाहिका आणि स्कूल बसला वाट मोकळी केली. हे आंदोलन पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. दुपारच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांना विनंती करून एक लेन मोकळी केली. आंदोलकांनीही पोलिसांच्या विनंतीला मान देवून सहकार्य केलं. या लेनवरून अत्यावश्यक सेवेसह अन्य वाहतूक सुरु करून दिली होती.

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर जाळ पोळ करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. याशिवाय मंत्रालय जाळण्याचा इशाराही आंदोलक देत होते.

Back to top button
error: Content is protected !!