महाराष्ट्र

मराठा आरक्षण: सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ठोस निर्णय नाही, ओबीसीतून आरक्षण देण्याचा साधा ठरावात उल्लेखही नाही ! या बैठकीला तेच नेते होते जे आजपर्यंत एकमेकांवर आरक्षणाचे खापर फोडत आले !!

छत्रपती संभाजी नगर लाईव्ह, २ – मराठा आरक्षणावरून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपसलेल्या उपोषणाच्या हत्यारावरून संपूर्ण महाराष्ट्र धुमसत आहे. राज्यकर्ते मिटिंगा घेऊन चहा बिस्किटे फस्त करण्याचं काम करत असल्याचा रोष मराठा समाजातून व्यक्त करण्यात येत आहे. काल मुंबईत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. ओबीसीतून सर्व मराठ्यांना आरक्षण द्यावे या एकमेव मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात एकही ठराव न घेता केवळ पोकळ आश्वासन देऊन नेहमीप्रमाणे राजकीय नेत्यांनी मराठा समाजावर अन्याय केला.

मराठा आरक्षण वरून शिवसेना भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांवर आरोप करून मराठा आरक्षण घालवल्याचे प्रसारमाध्यमासमोर उजळ माथ्याने सांगतात. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे उठाव करणारे लोकप्रतिनिधी मराठा समाजावर सतत अन्याय करत असल्याची भावना मराठा समाजामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी घातली आहे

राजकीय नेत्यांची पायाखालची जमीन सरकली असून मराठा समाजाला आम्हीच आरक्षण देऊ शकतो यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे याचसाठी त्यांनी काल मुंबईत सर्वपक्षीय बैठक घेतली मात्र या बैठकीत कोणताही ठोस ठराव घेतला नसल्याने मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या आमरण उपोषणावर ठाम असून उपोषण आणखी कठोर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे त्यामुळे राज्यकर्ते मराठा समाजाची मनधरणी करण्यात पुन्हा एकदा सपशेल फेल ठरले आहे

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीतील ठराव पुढीलप्रमाणे – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी.

मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे. हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो.

राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!