छत्रपती संभाजीनगरफुलंब्री
Trending

हर्सूलमध्ये मोटारसायकल बसच्या भीषण अपघातात चौका येथील युवक ठार ! फुलंब्रीकडून येणाऱ्या भरधाव बसने मोटारसायकलस्वारास चिरडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- फुलंब्रीकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या भरधाव एसटी महामंडळाच्या बसने मोटारसायकलस्वाराला चिरडल्याची घटना हर्सूलमध्ये रात्रीच्या सुमारास घडली. यात चौका येथील युवकाचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल व बस एकमेकांत अडकल्या होत्या. जळगाव छत्रपती संभाजीनगर मार्गावरील हर्सूल गावाजवळील कब्रस्थानजवळ ही भीषण दुर्घटना घडली. बाबासाहेब संजय वाघ (वय 19 वर्षे रा. चौका ता. फुंलब्री जि. छत्रपती संभाजीनगर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

कृष्णा बाजीराव वाघ (वय 27 वर्षे, शेतकरी रा. चौका ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्यांचा सख्खा चुलत भाऊ बाबासाहेब संजय वाघ हा सकाळी 08.30 वाजता बजाज शोरुम (छत्रपती संभाजीनगर) येथे खाजगी नोकरीसाठी येत होता. दि. 11/08/ 2023 रोजी 20.30 वाजेच्या सुमारास बाबासाहेब संजय वाघ (वय 19 वर्षे रा. चौका ता. फुंलब्री जि. छत्रपती संभाजीनगर) हा त्याची मोटारसायकल (MH-20-DR-5345) बजाज कंपनीची प्लॅटीना या गाडीवर छत्रपती संभाजीनगर येथून चौका गावाकडे घरी जात असताना हर्सूल गावच्या पुढे कब्रस्तान जवळ (जळगाव रोडने) फुलंब्रीकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणार्या महामंडळाच्या बसने (क्रंमाक MH.20- BL- 1522) बाबासाहेबच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली.

या अपघातात बाबासाहेब संजय वाघ याच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागला व मोटार सायकलचे नुकसान झाले. ही माहिती मिळताच कृष्णा वाघ व त्यांच्यासोबत भाऊ ऋषिकेश वाघ व विजय उमाजी वाघ यांनी हर्सूल टि पॉइन्टवरून घटनास्थळ गाठले. महामंडळाची बस व मोटारसायकल या दोन्ही गाड्या घटनास्थळी एकमेकांत अडकलेल्या होत्या. अपघात झाल्याबरोबर तेथे जमलेल्या जमावापैकी एका जणाने 108 अंब्युलन्सला फोन केलेला होता. त्यामुळे त्याठिकाणी थोड्याच वेळात अंब्युलन्स आल्याने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या बाबासाहेब यास घाटी दवाखान्याच्या अपघात विभागात दाखल केले. डॉक्टरांनी बाबासाहेब यास तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी मृत युवकाचे नातेवाईक कृष्णा बाजीराव वाघ (वय 27 वर्षे, शेतकरी रा. चौका ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महामंडळाच्या बस क्रंमाकMH-20- BL-1522 च्या चालकावर हर्सूल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!