छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

नांदेड निझामाबाद एक्स्प्रेस काही दिवस रद्द !

नांदेड, दि. ९ – हैदराबाद विभागातील विविध ठिकाणी सुरु असलेले रेल्वे मुलभूत सुविधांचे विकास कार्य करण्याकरिता तसेच रेल्वे पटरीचे कार्य करण्या करिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
01) गाडी संख्या 07854 नांदेड- निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 09 ते 15 जुलै, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
02) गाडी संख्या 07853 निझामाबाद-नांदेड एक्स्प्रेस दिनांक 10 ते 16 जुलै, 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
१) गाडी संख्या 11409 दौंड निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 09 जुलै ते 15 2023 जुलै दरम्यान मुदखेड ते निझामाबाद मध्ये अंशतः रद्द करण्यात आली आहे.
२) गाडी संख्या 01413 निझामाबाद ते पंढरपूर एक्स्प्रेस दिनांक 10 जुलै ते 16 जुलै, 2023 दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!