महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या डॉ. प्राची पवार यांच्यावर नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला!

नाशिक, दि. १४ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकमधील पदाधिकारी डॉ. प्राची पवार यांच्यावर काल, १३ डिसेंबरला रात्री उशिरा दारूड्या टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. यात त्‍या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजी आमदार वसंत पवार यांच्या त्या कन्या आहेत. प्राची पवार फार्म हाऊसमध्ये गेल्या असता नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवर्धन शिवारात ही घटना घडली.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून संशयितांची ओळख पटवली जात आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितलं. घटनेबद्दल त्‍यांनी सांगितलं, की फार्म हाऊसमध्ये दोघे झाडीत लपलेले होते. त्यांनी दुचाकी पवार फार्म हाऊसजवळ आणलेली होती. त्यांना प्राची यांनी हटकले असता हल्ला करून करून ते पसार झाले.

डॉ. प्राची पवार यांच्यावर सुश्रुत हॉस्पिटल उपचार सुरू असून, रुग्णालयात कार्यकर्त्यांसह नातेवाइकांनी गर्दी केली. सध्या प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. डॉ. प्राची पवार या मनी शंकर आय हॉस्पिटलच्या संचालिका आहेत. हल्लेखोर दारू पिलेले हाेते, अशी माहिती समोर येत आहे.

Back to top button
error: Content is protected !!