महाराष्ट्र
Trending

शेतीचा वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाल्यास तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणची मोहीम: स्वतंत्र संचालक विश्वास पाठक

ट्रान्सफॉर्मरच्या समस्येबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांचे मत

लातूर दि.२८ : शेतामध्ये वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाला तर त्या जागी तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे व त्याला यशही मिळत आहे. तथापि, शेतकऱ्यांनी खूप मोठ्या संख्येने एकाच वेळी कृषी पंप सुरू करणे किंवा काहीजणांनी अनधिकृत वीज जोड घेणे यामुळे ट्रान्सफॉर्मवर ताण येऊन ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटना घडतात. ट्रान्सफॉर्मरच्या समस्येबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे, असे मत एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी मंगळवारी लातूर येथे व्यक्त केले.

महावितरण, महानिर्मिती, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत पाठक बोलत होते. यावेळी फार्मर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेशदादा हाके पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, महापारेषणचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर आणि महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक समीर घोडके उपस्थित होते. विश्वास पाठक म्हणाले की, ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर किंवा बिघडल्यानंतर त्याची खबर देण्यासाठी महावितरणने टोल फ्री नंबरची सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच महावितरणच्या ॲपवरून ही खबर देता येते. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून महावितरणने ट्रान्सफॉर्मर बिघडल्यानंतर लवकरात लवकर त्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी विविध उपाय योजना केली असून मोहीमेला यश येत आहे.

त्यांनी सांगितले की, ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक भार आल्यामुळे तो जळतो किंवा बिघडतो. ही समस्या अनेकदा अनधिकृत कनेक्शनमुळे घडते. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या समस्येबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. या बाबतीत लोकप्रतिनिधींनीही सहकार्य करावे. लातूर जिल्ह्यात १ लाख ३९ हजार कृषी ग्राहक आहेत. जिल्ह्यातील कृषी ग्राहकांचे मोठे प्रमाण ध्यानात घेता लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम चालवावी.

ते म्हणाले की, वीज वितरण जाळे मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरडीएसएस योजनेतून लातूर जिल्ह्यात उपकेंद्रे, फीडर सेपरेशन, ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढविणे अशी १७७९ कोटी रुपयांची पायाभूत सुविधेची कामे हाती घेतली आहेत. ही कामे १८ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील वीज पुरवठ्यात खूप चांगली सुधारणा होईल. त्यासोबत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा वापरून सात हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनांमुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्राच्या आमूलाग्र बदल होणार आहे.

सुंदर लटपटे यांनी सांगितले की, कृषी पंपांना कपॅसिटर जोडले तर पंपांची व्होल्टेजची समस्या सुटेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी पंपांना कपॅसिटर बसविणे उपयुक्त ठरेल. त्यासोबत शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी महावितरण उपकेंद्रांमध्ये कपॅसिटर बँक बसवित आहे.

गणेशदादा हाके पाटील यांच्या नेतृत्वात अहमदपूर व चाकूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याविषयी समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्याचे आश्वासन विश्वास पाठक यांनी दिले. अधीक्षक अभियंता मदन सांगळे, मा. अविनाश निंबाळकर व समीर घोडके यांनी अनुक्रमे महावितरण, महापारेषण व महाऊर्जाच्या जिल्ह्यातील कामाविषयी सादरीकरण केले.

Back to top button
error: Content is protected !!