छत्रपती संभाजीनगर
Trending

पोलीस अमलदारांना नववर्षाचे पदोन्नती गिफ्ट ! जिल्हा पोलीस आस्थापनेवरील 129 पोलीस नाईकांना पदोन्नतीचे आदेश जारी !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी विभागीय पोलीस पदोन्नती शासन निर्णयानुसार पोलीस आस्थापना मंडळाची बैठक घेऊन जिल्हा पोलीस आस्थापनेवरील 129 पोलीस नाईक संवर्गातील पोलीस अंमलदार यांची पोलीस हेडकॉन्स्टेबल (पोलीस हवालदार) तर पोलीस हेड कॉन्स्टेबल या श्रेणीतील 12 जणांची  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सफौ) या पदावर पदोन्नतीचे आदेश जारी केले आहे.

विभागीय पदोन्नती समितीने सदरचे पदोन्नतीचे निर्णय हे उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई व सर्वोच्च न्यायालय विशेष अनुमती याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून पारित केले आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या निर्णयाने प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार यांचे पदोन्नतीचे आदेश पारित करण्यात आले आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस अमलदार यांना पोलीस अधीक्षक यांनी नववर्षा निमित्ताने पदोन्नतीचे भेट दिल्याने पोलीस अंमलदार यांच्यामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस अधीक्षक यांनी पदोन्नती झालेल्या सर्व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन करून उत्कृष्ट कर्तव्य  करण्याबद्दल त्यांना प्रोत्साहित केले आहे.

पदोन्नती पोलिसांची यादी खालीलप्रमाणे- (क्लिक करा पीडिएफ फाईल्स)

PN-HC promotion 2022

HC -ASI PRAMOTION 2022

Back to top button
error: Content is protected !!