छत्रपती संभाजीनगरसिल्लोड
Trending

सिल्लोड आगाराच्या बस चालकाला धक्काबुक्की, वेरुळची बस विचारण्यावरून छत्रपती संभाजीनगर बसस्टॅंडवर धमकावले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६- छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड या बस चालकाला प्रवाशांनी वेरुळची बस कोणत्या प्लॅटफॉमवर लागते असे विचारले असता एकाने मध्येच बोलून बसचालकाला धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर बसस्टॅंडवर झाला. यामुळे बसचालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. जाकिर असे आरोपीचे नाव आहे.

रमेश तेजराव सपकाळ (वय 43 वर्षे, ड्रायव्हर, महामंडळ एस.टी. चालक, सिल्लोड आगार रा. शिवाजीनगर होंडा शोरुमच्या बाजुला सिल्लोड ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर)  यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, सुमारे सात वर्षापासुन एस. टी. महामंडळ येथे ते नोकरी करतात. दिनांक 15/07/2023 रोजी बस चालक रमेश तेजराव सपकाळ यांची ड्युटी सकाळी 08.00 वाजेपासुन सुरु झाली.

पहिली फेरी सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर पूर्ण करून दुसरी फेरी करिता 12.30 वाजता महामंडळाची बस क्र.MH-40 N 9884 घेवून सिल्लोड येथून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानक येथे 14.00 वाजेच्या सुमारास पोहचले. पुन्हा परत सिल्लोड जाण्याकरिता बस चालक रमेश तेजराव सपकाळ यांनी बस सिल्लोडच्या प्लॉटफॉर्वर लावून खाली उतरले असता काही प्रवाशांनी त्यांना विचारले की, वेरुळ जाणारी बस कुठे लागते. बस चालक रमेश तेजराव सपकाळ यांनी त्यांना हाताने इशारा करून सांगितले की, वेरुळ जाणारी बस बाजुच्या प्लॅटफॉर्वर लागेल.

तेव्हा तिथे उभा असलेला जाकिर हा प्रवाशांना म्हणाला याला काहीच माहित नाही. तू बाहेर जा, तेथून बस लागेल. तेव्हा बस चालक रमेश तेजराव सपकाळ हे प्रवाशांना म्हणालो की तुम्ही चौकशी कक्षात जावून विचारा, असे सांगितले. या कारणावरून जाकिर यास राग येवून त्याने बस चालक रमेश तेजराव सपकाळ यांना शिवीगाळ करणे चालू केले तसेच  सार्वजनिक कामात अडथळा करून बस चालक रमेश तेजराव सपकाळ यांना धक्काबुक्की केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणई बस चालक रमेश तेजराव सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाकिर यांच्यावर क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!