महाराष्ट्र
Trending

अंबादास दानवे यांच्या लेटरबॉम्बने मंत्री राधाकृष्ण विखेंच्या अडचणीत वाढ, व्वा रे व्वा विखे पाटील ! लाचखोरी प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्याकडे केली होती शिफारस !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – पुणे येथील आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांचे लाच प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. रामोड यांनी भ्रष्ट्राचाराच्या माध्यमातून जमवलेली माया व प्रॉपर्टीसंदर्भात रोज नवनव्या बातम्या प्रसारमाध्यमातून समोर येत आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर लेटर बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली आहे. लाचेच्या प्रकरणात अटकेत असलेल्या रामोड या अधिकाऱ्याची पुण्यावरून बदली करू नये असे शिफारस पत्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. हे पत्र दानवे यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, पुणे येथे आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड हा 8 लाख रुपये लाच घेतल्यामुळे सीबीआयने अटक केल्यावर सध्या कारागृहात आहे. परंतु या प्रकरणात महसूलमंत्री राधाकृष्ण विखेचे नाव समोर आले आहे. त्या मंत्र्याने रामोड याची बदली पुण्यावरुन करु नये. यासाठी शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते.

महसूल अधिकारी अनिल रामोड याला पुण्यात एक वर्ष मुदतवाढ देण्यात यावी. यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिफारस केली होती. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यांना पत्र लिहिले होते. १ जून रोजी विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. रामोड हे पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्याला याच पदावर मुदत वाढ मिळावी, असे पत्र विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, असा दावा दानवे यांनी ते पत्र ट्वीट करून केला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले हेच ते शिफारस पत्र.

Back to top button
error: Content is protected !!