छत्रपती संभाजीनगर
Trending

छत्रपती संभाजीनगरात पाचस्तरीय पेट्रोलिंगचे आदेश, ५१ पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक ! अपघात, खून, दरोडा, आगिच्या घटनास्थळी शक्तीमानसारखे तातडीने पोहोचणार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून पाच स्तरीय पेट्रोलिंग आजपासून सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार घेताच शहरातील संवेदनशिलता पाहता व शहराच्या सुरक्षीततेच्या बाबत कडक निर्णय घेत शहरात २४ तास पोलिसांची गस्त असावी त्यादृष्टीने पाच स्तरीय पेट्रोलिंगची संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत पाच स्तरीय पेट्रोलिंग योजना आजपासून शहरात राबविण्याचे आदेश दिले आहेत.

१) जनरल चेकिंग, २) झोनल चेकिंग, ३) मुख्यालय पेट्रोलिंग, ४) गुड मॉर्निंग पेट्रोलिंग, ५) दिवसपाळी पेट्रोलिंग याप्रमाणे पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यावरील दर्जाचे ५१ पोलीस अधिकारी नेमुन ” पाच स्तरीय पेट्रोलिंग ” योजना तयार केली आहे.

१) जनरल चेकींग करीता सहाय्यक पोलीस आयुक्त ते पोलीस उप आयुक्त दर्जाचे अधिकारी नियुक्त केले असून ते जनरल चेकींग दरम्यान अचानकपणे पो.स्टे. ला सरप्राईज भेट देतील. पो.स्टे. लॉकअप गार्डचे अंमलदार, सेंट्री डयुटी करणारे अंमलदार हे सतर्क आहेत का हे पाहतील. रात्रगस्त दरम्यान अपघात, खून, जबरी चोरी, दरोडा आग अशा प्रकारच्या घटना घडल्यास घटनास्थळी भेट देतील त्या ठिकाणी आवश्यक ते मनुष्यबळ रवाना करतील संबंधिताद्वारे योग्य ती कायदेशिर कार्यवाही करून घेतील.

२) झोनल चेकींग करीता पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी अधिकारी नियुक्त केले असून ते परीमंडळ 01 ते 02 प्रमाणे पो. स्टे हद्दीत पेट्रोलींग करतील व पेट्रोलींगच्या दरम्यान नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देतील व परिणामकारक नाकाबंदी करून घेतील. रात्रगस्ती दरम्यान झोनल हद्दीतील रात्रगस्तीचे अधिकारी व कर्मचारी, पि.सी. आर. मोबाईल, व पो.स्टे. चे पिटर मोबाईल व टु मोबाईल व पो.स्टे. चे रात्रगस्तीचे कर्मचारी यांना वेगवेगळया ठिकाणी बोलावुन चेक करुन त्यांचेकडुन सतर्कतेने पेट्रोलींग करून घेतील.

३) मुख्यालय चेकिंग सपोनि. ते पोनि. दर्जाचे अधिकारी नेमले असून ते संपूर्ण शहरात पेट्रोलिंग करतील. शहरात कुठे काही घटना घडल्यास तात्काळ घटनास्थळावर पोहचतील व पोलीस स्टेशनचे डी ओ अधिकारी यांना घटनेबाबत कायदेशिर कारवाई करणे बाबत सूचना देतील.

४) गुड मॉर्निंग पेट्रोलिंग करीता सपोनि दर्जाचे अधिकारी यांना नियुक्त केले असून ते सकाळी साडेचार वाजता पेट्रलिंग करीता रवाना होवून संपुर्ण शहरात गस्त करून शहरातील संवेदनशिल ठिकाणे, धार्मीक स्थळे, महापुरूषांचे पुतळे याठिकाणी भेटी देतील, तसेच पोलीस स्टेशन येथील गुड मॉर्निंग स्कॉडला चेक करतील.

५) संपूर्ण शहरात दिवसपाळी पेट्रोलिंग करीता सपोनि. दर्जाचे पोलीस अधिकारी यांची नेमणुक केली असून परिमंडळ 1 व 2 मध्ये दिवसा पेट्रोलिंग करतील. पेट्रोलिंग दरम्यान आपआपले परिमंळमधील II मोबाईल, बीट मार्शल, डायल 112, आर सी पी पथक, पोलीस मुख्यालय येथून लागलेले महत्वाचे गार्ड यांना चेक करतील. पेट्रोलिंग दरम्यान अपघात, खून, जबरी चोरी, दरोडा, आग अशा प्रकारच्या घटना घडल्यास तात्काळ घटनास्थळी भेट देतील. गर्दीच्या ठिकाणी, निर्जन स्थळे, प्राणभुत केंद्र याठिकाणी भेटी देतील.

याव्यतिरिक्त १७ पोलीस स्टेशनची त्यांचे हद्दीत दैनंदिन पेट्रोलिंग करीता पोलीस स्टेशनचे अधिकारी / अंमलदार यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. याप्रकारे शहर पोलीस शहरवासियांचे सुरक्षेकरीता तसेच शहरात शांतता व सलोखा अबाधित ठेवण्याकरीता कार्यरत राहतील. शहरवासियांनी “दक्ष नागरिक, सुरक्षीत परिसर” व “आपला शेजारी, खरा पहारेकरी” ही संकल्पना राबवावी व पोलिसांना सहकार्य करावे. संकट समयी नागरिकांनी डायल ११२ या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करून मदत घ्यावी. छत्रपती संभाजीनगर पोलीस नागरिकांच्या सेवेत सदैव तत्पर असून नागरिकांनी २२४०५०० या दुरध्वनि क्रमांकावर संपर्क करून पोलीस मदत मागावी किंवा त्यांचे समक्ष घडत असलेल्या घटनेची, गुन्ह्याची माहीती तात्काळ पोलीसांना द्यावी असे अवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!