छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

पैठणचे गंभीर गुन्ह्यातील २ फरार आरोपी अटकेत ! एकाला नांदर येथील विवाह सोहळ्यातून पळून जाताना तर दुसऱ्याला बीड जिल्ह्यातून उचलले !!

पोलिसांनी दोघांनाही पाठलाग करून शिताफिने जेरबंद बंद केले

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील २ आरोपी तब्बल 11 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन दडून बसले होते. एकाला पैठण तालुक्यातीलच विवाह सोहळ्यातून पळून जातांना पोलिसांच्या तीन पथकांनी घेराबंदी करून बेड्या ठोकल्या. दुसरा आरोपी हा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात लपला होता. पोलिसांनी धावा बोलताच त्याने धूम ठोकली. उचाच्या फडाच्या बांधावरून तब्बल ३ किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

नंनग्या मोमीन चव्हाण (रा. सालवडगाव ता. पैठण) व प्रकाश रामदास हराळे (जायकवाडी वस्ती, गेवराई, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. यातील प्रकाशने ११ वर्षांपूर्वी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून गेला होता. तेव्हापासून तो पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये होता. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी जिल्हयातील पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयात पाहिजे/ फरार असलेल्या आरोपीतांचा शोध घेवून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश सर्व प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. यामुळे गुन्हे करून अनेक वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देणा-या आरोपीतांना जेरबंद करण्याची धडक मोहीम राबवण्यात येत आहे.

जिल्हा पोलीसांना मागील अकरा वर्षांपासून गंभीर गुन्हयात पाहिजे असलेले दोन आरोपीतांना अत्यंत शिताफिनी अटक करण्यात यश आले आहे. पोलीस ठाणे चिकलठाणा हद्यीत सन- 2010 मध्ये दरोडयाचा गुन्हा घडलेला होता. यामध्ये आरोपी नंनग्या मोमीन चव्हाण (रा. सालवडगाव ता. पैठण) हा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा चिकलठाणा पोलीस ब-याच दिवसांपासून शोध घेत होते. गुन्हा घडून 11 वर्षे झालेले असूनही आरोपी पोलीसांच हाती लागत नव्हता. तरीही पोलीस त्यांच्या मागावर होतेच. त्याच्याबाबत गोपनीय माहिती घेवून त्याला जेरबंद करण्याची तयारी चिकलठाणा पोलीसांनी केली.

यावेळी खब-याने पाहिजे असलेला आरोपी नंनग्या चव्हाण हा एका विवाह सोहळयासाठी पैठण तालुक्यातील नांदर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. यावर चिकलठाणा पोलीसांनी तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी धाव घेवून आरोपीला पकडण्यासाठी पोलीसांनी वेगवेगळी तीन पथके तायार करून सापळा रचत असतांना त्याला पोलीसांची हालचालीची चाहुल लागताच त्यांने गावातून पळ काढला. यावेळी पोलासांचे एक पथक त्याचे दिशेने तर दुसरे पथक हे त्याला घेरण्यासाठी दुस-या बाजुने तर तिससे पथक वाहनाद्वारे मुख्य रस्त्याचे दिशने असा पध्दतीने त्यांची घेराबंदी करून पोलीसांनी त्याचा एक किलोमिटर पर्यंत पाठलाग करत अत्यंत शिताफिने त्याला पकडत त्याचे मुसक्या आवळल्या.

पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून गेलेला आरोपी ११ वर्षांनी जाळ्यात अडकला- पोलीस ठाणे एम. पैठण येथिल सन – 2010 मधील भादंवी कलम 399, 402,353,307, तसेच कलम 4/25 भा.ह.का. मधील 15 आरोपी हे दोन वाहनात येवून एम. पैठण परिसरात घातक शस्त्रासह दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असताना पोलीसांना याबाबत गोपीनीय माहिती मिळताच पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी लावून संशयित दोन्ही वाहनास अटकाव केल्याने यातील आरोपीतांनी त्यांची वाहने ही पोलीसांच्या अंगावर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करून पळून जाताना पेालीसांनी जिवाची पर्वा न करता दोन्ही वाहनांना घेरून यातील घातक शस्त्रासह असलेले आरोपीतांना पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी 14 आरोपी पकडयात पोलीसांना यश आले होते. परंतु यातील पंधरावा फरार आरोपी प्रकाश रामदास हराळे यांने पोलीसांचे अंगावर सरळ वाहन चालवून हल्ला करून निसटून पळून जाण्यात त्यावेळी यशस्वी झाला होता.

या आरोपीचा सुध्दा शोध पोलीस मागील 11 वर्षांपासून घेत होते. याबाबत सुध्दा गोपनीय बातमीदा मार्फत माहिती मिळाली की पाहिजे असलेला आरोपी प्रकाश रामदास हराळे हा जायकवाडी वस्ती (गेवराई जि. बीड) येथे स्वत:चे अस्तिव लपवून एका पत्राचे शेडमध्ये राहत आहे. पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी अत्यंत गोपनीय पध्दतीने वेशांतर करून तो राहत असलेल्या पत्राचे शेडच्या घराजवळ सापळा लावला. आरोपी हा घरातून बाहेर येताच तो पाहिजे असलेला आरोपी असल्याबाबत खात्री होताच पोलीस त्याच्या दिशेन जाताच तो घराचे लागून असलेल्या उसाचे शेताने पळत सुटला. पोलीसांनी त्याचा 3 कि.मी. पाठलाग करून प्रकाश रामदास हराळे जायकवाडी वस्ती (गेवराई जि. बीड) अटक केली.

दोन्ही गुन्हयातील आरोपी हे पोलीसांना मागील 11 वर्षांपासून त्यांचे स्वत:चे अस्तित्व लपवून व वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदली करून गुंगारा देत असतांना सुध्दा पोलीसांनी त्यांना अत्यंत कसोशिने व कौशल्यपुर्ण पध्दतीने जेरबंद केले आहे.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. विशाल नेहुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, रविंद्र खांडेकर, पोलीस निरीक्षक, भागवत नागरगोजे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सतिश देवकर, दीपक देशमुख, गणेश कोरडे, राजेश चव्हाण, राजेश सोनवणे, ओम डहाळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!