महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांचे सानुग्रह सहाय मंजूर ! कोविड 19 काळात कर्तव्यावर झाला होता मृत्यू !!

मुंबई, दि. २२- कोव्हिड – १९ संबंधित कर्तव्य बजावत असताना कोव्हिड १९ मुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी यांना सानुग्रह सहाय मंजूर करण्यात आले आहे. वारसांना प्रत्येकी ५० लाख मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.

वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २९ मे २०२० अन्वये कोव्हिड १९ संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचा-यांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कौविड विषयक कर्तव्यावरील (सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य इ.) कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या सर्व प्रकरणी रु.५० लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय मंजूर करण्याची कार्यपध्दती शासन निर्णयामध्ये नमूद करण्यांत आली आहे.

वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून कोविड- १९ संबंधीत कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी प्रत्येकी रु. ५० लक्ष रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नांव

श्रीमती कमल गंगाराम पडलवार (नांदेड)

श्रीमती प्रयाग गोविंद केंद्रे (श्रीमती सुरेखा बाबू गिते) (नांदेड)

श्रीमती जाकिया नविद मुंडे (ठाणे)

श्रीमती शैला अनिल पाध्ये (यवतमाळ)

श्रीमती रंजना श्यामसिंग गौतम (श्रीमती रंजना अनिल चव्हाण) (अमरावती)

श्रीमती तारा गंगाराम दुमाने (श्रीमती तारा किसन मेश्राम) (गडचिरोली)

श्रीमती सविता अरूण धातुंडे (सांगेली)

श्रीमती मंगल मोहन पाटील (सांगली)

3. वित्त विभाग शासन निर्णय दि. २९.५.२०२० मधील तरतूदीनुसार वरीलप्रमाणे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या वारसास या संदर्भातील तरतुदी व नियम विचारात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांची राहील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!