
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – जबरी चोरीचा प्रयत्न करणार्या चोरट्यांना लोकांनी चांगलेच बदडून काढले. एक चोरटा पळून गेला मात्र दोन चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सालगाव परिसरात रात्रीच्या सुमारास घडली.
उत्तम भिका गायकवाड (वय 32 वर्षे), संजय शिवाजी चव्हाण (35 वर्षे दोन्ही रा. पारधीवडा परतूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात पोलिस पाटील बापूराव केशवराव सालगावकर (पोलीस पाटील रा. सालगाव ता. परतूर जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, 15 वर्षापासून ते पोलीस पाटील म्हणून काम काज पाहत आहेत. दिनांक 02/01/2023 रोजी पोलिस पाटील बापूराव केशवराव सालगावकर हे नेहमी प्रमाणे सांयकाळी शेतातून घरी येऊन रात्री 08.30 वा. सुमारास जेवण करुन झोपले.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
दरम्यान, रात्री 12.30 ते 01.00 वाजेच्या सुमारास गावात आरडा ओरडन्याचा आवाज आला. कुत्रे भुकन्याचा आवाज आल्याने पोलिस पाटील बापूराव केशवराव सालगावकर यांना झोपेतून जाग आली. आवाजाच्या दिशेने ते गेले असता. सालगाव व रेवलगाव येथील लोक चोर आले चोर आले म्हणून धावपळ करीत होते. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दोन चोरट्यांना काही लोकांनी पकडून मारहान करीत होते.
तेंव्हा पोलिस पाटील बापूराव केशवराव सालगावकर व गावातील नारायण सुभाष थोरे, परमेश्वर भाऊसाहेब राऊत, लक्ष्मण राजाराम गाढवे यांनी सोडवा सोडव केली. यानंतर गावातील लोक आंधारात पळून गेले ते कोण होते हे समजू शकले नाही. त्यानंतर पोलिस पाटील बापूराव केशवराव सालगावकर यांनी चोरट्यांना त्यांचे नाव गाव विचारले. त्यांनी त्यांची नावे उत्तम भिका गायकवाड (वय 32 वर्षे), संजय शिवाजी चव्हाण (35 वर्षे दोन्ही रा. पारधीवडा परतूर) असे सांगितले.
तर पळून जानार्या साथीदाराचे नाव राहुल उध्दव काळे (रा. पाराधीवाडा परतूर) असे सांगितले. आम्ही चोरी करण्यास आलो होतो परंतु लोकांनी आम्हांला पाहिल्यामुळे चोरट्यांनी लोकांना मारण्याचा धाक दाखविल्याने लोकांनी चोरट्यांना मारहाण केली. दरम्यान, पोलिस पाटील बापूराव केशवराव सालगावकर यांनी बिट जमादार कोकणे व पोलीस उपनिरीक्षक अंभोरे यांना फोन करुन सदर घटनेची माहीती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दखल झाले. दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.