छत्रपती संभाजीनगर
Trending

पोलिसांसाठी मोठी बातमी: २६ कोटी ९४ लाख ७७ हजारांचा घरबांधणी अग्रीम मंजूर ! ग्रामीणच्या १३३ पोलिसांना मिळणार हक्काचे घर !!

रक्कम तातडीने पोलिस अंमलदार यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे एसपींचे आदेश

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- पोलिस अंमलदारांसाठी मोठी बातमी आहे. २६ कोटी ९४ लाख ७७ हजारांचा घरबांधणी अग्रीम शासनाकडून मंजूर झाला असून यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या १३३ पोलिसांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही रक्कम तातडीने पोलिस अंमलदार यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी आजच दिले.

पोलीस महासंचालक कार्यालय, म.रा. मुंबई यांच्या कडून पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घर खरेदी, घर बांधणी करिता त्यांच्या शासकीय सेवानुसार सुलभ गृहकर्जाची खात्याअंतर्गत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलीसांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यास मदत होते. या योजनेमुळे पोलीसांना स्वतःची कायमस्वरूपाची घरे उपलब्ध होण्यास निश्चीत मदत होते.

याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या आस्थापनेवरिल पोलीस अधिकरी व अंमलदार यांनी घर बांधणी / घर खरेदी करिता पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांना विहीत नमुन्यानुसार अर्ज सादर करण्यात आले होते. परंतु ब-याच कालावधी पासून गृहकर्जाचे प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे पोलीसांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहिले होते.

पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी या प्रलंबित गृहकर्जाचे प्रस्तावाबाबत वेळोवेळी आढावा घेवून या गृहकर्जाच्या अनुषंगाने कामकाज करणारे संबधीत अधिकारी व लिपीक यांना सूचना देवून याबाबत वरिष्ठ कार्यालयास पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले होते.

याच अनुषंगाने पोलीस महासंचलाक कार्यालयाकडून दिनांक २६ / ६ / २०२३ रोजी पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे आस्थापनेवरिल १३३ पोलीस अंमलदार यांचे एकूण २६,९४,७७,८६१/- रुपयांचा घरबांधणी अग्रीम शासनाकडून मंजुर करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक यांनी गृहकर्जाची अग्रीम रक्कम ही तातडीने पोलीस अंमलदार यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले असून यामुळे १३३ पोलीस अंमलदार यांचे स्वतःचे घर खरेदी / बांधण्याचे ब-याच वर्षांपासूनचे स्वप्न आज आषाढी एकादशीच्या पावन उपलब्धीत प्रत्यक्षात साकार होणार आहे. पोलीसांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. त्यामुळे पोलीस अंमलदारमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button
error: Content is protected !!