जालन्यात तेली जातीच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३५ हजारांची लाच घेतली ! जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील संशोधक सहाय्यक जाळ्यात !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २५- तेली जातीचे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यायासाठी जालना जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात केलेल्या अर्जात त्रुटी काढून ३५ हजारांची लाच घेणारा संशोधक सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. आज, २५ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून कदिम जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राहुल शंकर बनसोडे (वय 43 वर्षे, पद – संशोधक सहाय्यक (कंत्राटी ), नेमणूक – जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, जालना, जि. जालना. रा. पंचशीलनगर, मोंढा नाका, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांच्या मुलांनी तेली जातीचे जात वैधता प्रमाणपत्र काढण्यायासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, जालना येथे अर्ज केला होता. सदर अर्जात त्रुटी असल्याचे कारण देऊन दिनाक 22/09/2023 रोजी यातील आरोपी राहुल बनसोडे याने पंचासमक्ष वरिष्ठांच्या नावाने 35000 रूपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यावरून सापळा कारवाई दरम्यान आज दिनांक 25/09/2023 रोजी यातील आरोपी बनसोडे याला तक्रारदार यांचे मुलांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पंचासमक्ष 35,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी बनसोडे याचेकडून 35,000 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर बाबत पोलीस ठाणे कदिम जालना जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी -किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, जालना, सापळा पथक – PN/घायवट, PC/गणेश बुजडे, PC/ गणेश चेके, PC/शिवलिंग खुळे, चालक बिरोनकर यांनी पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe