छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील टुनकी गावात छापेमारी, कपाशीच्या शेतात गांजाची शेती ! 30 किलोचा गांजा जप्त, शेतकऱ्यावर गुन्हा !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १६ – पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वैजापूर तालुक्यातील टुनकी गावातील शेतात छापेमारी करून पोलिसांनी ३० किलो गांजा जप्त केले आहे. कपाशीच्या शेतात गांजा मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी सदर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी विष्णू मन्सूब शिंदे (वय 45 वर्षे रा. टुनकी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. मनीष कलवानिया पोलीस अधीक्षक ग्रामीण, सुनील लांजेवार अपर पोलिस अधीक्षक, महक स्वामी सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील सहायक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिवूर यांनी व त्यांच्या पथकाने शिवूर हद्दीत शेत गट नंबर 126 मध्ये कपाशीच्या शेतात बेकायदेशीर रित्या गांजा सदृश्य झाडे लावून त्याची शेती करत आहे याबाबत गोपनीय माहिती काढून ndps कायदा अन्वये छापा मारला.

सदरच्या कारवाईत आरोपी विष्णू मन्सूब शिंदे (वय 45 वर्षे रा. टुनकी, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे बेकायदेशीर रित्या कपाशीच्या शेतात गांजा सदृश झाडे लावून शेती करताना मिळून आले. त्यांच्या विरुद्ध ndps कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई दरम्यान 30 किलो 110 ग्राम असा एकूण 240880 रुपये किंमतीचा गांजा मुद्देमाल हस्तगत करून कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस ठाणे शिवूर करत आहेत.

ही कारवाई महक स्वामी सहायक पोलिस अधीक्षक उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शानाखाली सपोनी संदीप पाटील, पोउपनि पवार , Asi जाधव , पोह गायकवाड मपोह पिंगट, पोना आघाडे, पो कॉ जाधव, पो कॉ पैठणकर मपोकॉ शेळके पो कॉ आंधळे , पो कॉ कमवतकर सर्व नेमणूक पोलिस स्टेशन शिवूर तसेच पो कॉ जोनवाल नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग वैजापूर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!