महाराष्ट्र
Trending

इर्शाळवाडीवर डोंगर कोसळून १० जणांचा मृत्यू, रायगडमध्ये पावसाचं थैमान ! ९८ जणांना वाचवण्यात यश, दरडीखाली २५ ते ३० घरे गाडल्या गेल्याची भीती !!

इर्शाळगडाचा कडा कोसळल्याने काळाचा घाला

रायगड, दि. २० – राज्यात पावसाने जोर धरला असून कोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर डोंगर कोसळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीच्या सुमारास हा डोंगर कोसळल्याने आदीवासी पाड्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही दूर्घटना घडली. आतापर्यंत ९८ जणांना वाचवण्यात यश आलेले असून रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरु आहे. या वस्तीवर एकूण ४८ कुटुंब असून २५ ते ३० घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत. सुमारे २०० ते ३०० लोकांची ही वस्ती आहे. आतापर्यंत ४८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल- ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. एनडीआरएफच्या २ चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण ४८ कुटुंब येथे आहेत. सुमारे ९८ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून १० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत, असे फडणवीस म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!