राजकारण
Trending

पवार साहेबांनी काँग्रेस पक्ष फोडून 40 लोक बाहेर काढले ! मग पवार साहेबांनी जनसंघासोबत तयार केलेले सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदे यांनी तयार केलेले सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? देवेंद्र फडणवीस यांचा जहरी सवाल

मुंबई, दि. २७ – पवार साहेब म्हणाले हे खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. परंतु मी काल जे बोललो ते एकतर पवार साहेबांनी ऐकले नाही किंवा ऐकले असेल तर ते त्यांना अस्वस्थ करणारे होते. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिली.

फडणवीस म्हणाले की, मी असे सांगितले की : 1978 साली पवार साहेब वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला. त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि जनसंघासोबत सरकार तयार केले. आता एकनाथराव शिंदे हे तर आमच्याच सोबत निवडून आले होते. ते 50 लोकं घेऊन बाहेर पडले आणि आमच्या सोबत सरकार तयार केले. मग पवार साहेबांनी तयार केलेले सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदे यांनी तयार केलेले सरकार ही बेईमानी कसे होऊ शकते?मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचो होतो; इतिहास बदलत नाही. कोण जन्माला आले, कधी आले याच्यावर इतिहास बदलत नसतो.

इतिहासात लिहून ठेवले आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वात 40 लोकांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले. ते बाहेर पडले. आणि भाजपसोबत म्हणजे तेव्हाच्या जनसंघासोबत सरकार तयार केले. तेच मी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!