छत्रपती संभाजीनगर
Trending

प्राध्यापकांच्या ७३ जागांच्या भरतीसाठी शेवटच्या दिवशी उमेवारांची झुंबड ! आस्थापना विभागा शेजारील कक्ष अर्जांनी खचाखच !!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

संभाजीनगर लाईव्ह, दि.२४ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या ७३ जागांच्या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.२१) उमेवारांनी मोठी गर्दी केली. प्राप्त झालेल्या अर्जानी आस्थापना विभागा शेजारील कक्ष खचाखच भरला असून कुलसचिव डॉ भगवान साखळे यांनी सायंकाळी आढावा घेतला.

कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली १५ वर्षांनंतर विद्यापीठात प्राध्यापक भरती होत आहे. विद्यापीठात विविध विभागात ७३ जागांसाठी ऑगस्टमध्ये जाहिरात देण्यात आली. २३ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. एकूण पाच हजार ८१५ अर्ज प्राप्त झाले. तर २१ सप्टेंबर हा अर्जाची हार्डकॉपी दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता.

शेवटच्या दोन दिवसात उमेवारांनी मोठी गर्दी केली. प्राप्त झालेल्या अर्जानी आस्थापना विभागाशेजारील कक्ष खचाखच भरला असून कुलसचिव डॉ भगवान साखळे यांनी सायंकाळी आढावा घेतला. तसेच नियोजित वेळ संपल्यावर सायंकाळी कक्ष सील करण्यात आला. यावेळी उपकुलसचिव दिलीप भरड यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पोस्टाच्या कर्मचार्यानी १५ पोते भरून अर्ज या काळात आणून दिले. अस्थापना विभागातील वरिष्ठ सहाय्यक व्ही .सी पवार व हरी दबदुले यांनी या सर्व अर्जांची नोंदणी केली. या भरती प्रक्रियेसाठी उपकुलसचिव दिलीप भरड, कक्षाधिकारी आर.आर.चव्हाण, संजय वाघ, रत्नाकर मुळे व सहकारी प्रयत्नशील आहेत. भरती संदर्भात अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, असे कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!