छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूजशिक्षण
Trending

विद्यापीठात कर्मचारी भरतीसह पदोन्नती मार्गी लावणार, कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची ग्वाही !

 चार जणांचा सेवागौरव

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.३१ : शिक्षकेत्तर कर्मचारी, शिक्षकांच्या निम्यापेक्षाही अधिक जागा रिक्त असून एकाजणास दुप्पट काम करावे लागत आहे, आगामी काळात शिक्षक, कर्मचारी भरती तसेच पदोन्नतीचे सर्व विषय मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवा गौरव समारंभाचे आयोजन बुधवारी (दि.३१) करण्यात आले. कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी डॉ.कैलास पाथ्रीकर, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जुलै अखेरीस निवृत्त होणारे डॉ.विकास शेंडे जीवरसायनशास्त्र विभाग, वरिष्ठ सहाय्यक अरविंद हेलवाडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ डी.एस.बनकर, स्थावर विभागाचे गणेश साळवे यांचा सेवागौरव करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले, विद्यापीठाच्या प्रगतीत शिक्षक व कर्मचारी या दोन्ही घटकांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

आपण नेहमीच लाभाच्या बाजुने उभे असून कोणताही अभिनिवेश न बाळगता विद्यापीठात्ता पुढे नेऊ, असेही कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. तर शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावणच्या बदल डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी कुलगुरुंसह प्रशासनाचे आभार मानले. यावेळी डॉ.विकास शेंडे, अरविंद हेलवाडे यांनी आपल्या सेवतेतील अनुभव कथन केले.

प्रारंभी चारही जणांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. अरविंद हेलवाडे व शुभदा हेलवाडे यांचाही गौरव करण्यात आला. उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी गेल्या महिन्यात निधन झालेल्या माजी कर्मचा-यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

कर्मचा-यांच्या खात्यात चार लाख जमा
शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांना सेवानिवृत्तीच्या वेळी जास्तीत जास्त ३०० दिवसांच्या शिल्लक रजांची रोख रक्कम देण्यात येते. यापुर्वी कर्मचा-यांना दोन लाख रुपयांचा निधी निवृत्तीच्या दिवशी मिळत असे. या संदर्भात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी झालेल्या बैठकीत सदर रक्कम चार लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची संपुर्ण रक्कम शंभर टक्के देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. डी.एस.बनकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अरविंद हेलवाडे वरिष्ठ सहाय्यक, व गणेश साळवे शिपाई हे कर्मचारी निवृत्त झाले. या कर्मचा-यांना रजा रोखीकरण योजनेचा लाभ झाला. रजा रोाखीकरणाचे चार लाख रुपये सेवानिवृत्तीच्या अखेरीस बँक खात्यात जमा झाले.

Back to top button
error: Content is protected !!