छत्रपती संभाजीनगर
Trending

तूर व उडीद डाळीच्या साठ्यावर निर्बंध, दर शुक्रवारी साठ्याची माहिती नोंद करणे अनिवार्य !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. 13 – केंद्रशासनाने 2 जून 2023 च्या अधिसुचनेद्वारे तुर व उडीद डाळीच्या मिल्स, घाऊक, अर्ध घाऊक, किरकोळ व्यापारी, आयातदारांकरीता साठा निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध दि.30 ऑक्टोंबर पर्यंत लागू आहेत.

अधिसूचनेप्रमाणे घाऊक व्यापारी प्रत्येक डाळी साठी 200 मे.टन्,किरकोळ व्यापारी प्रत्येक डाळीसाठी 5 मे टन. बिगचेन रिटेल प्रत्येक डाळीसाठी आऊटलेट साठी 5 मे टन व डेपोसाठी 200 मे टन तसेच मिल्स करीता गत तीन महिन्यातील उत्पादन क्षमता 25% आणि आयात दाराकरीता आयात दिनांकापासून 30 दिवसांचा साठा मर्यादीत करण्यात आला आहे.

या अधिसुचनेपासुन 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत साठा कमी करणे आवश्यक राहील, असे शासदनाद्वारे कळविण्यात आले आहे.तसेच fcainfoweb.nic.in या संकेतस्थळावर दर शुक्रवारी साठ्या बाबतची माहिती नोंद करणे अनिवार्य आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व संबधित आस्थापनाना कळविण्यात येते की, त्याच्या कडील तूर व उडीद डाळीचा साठा (दर शुक्रवारी) उपभोक्ता मामले विभागाच्या fcainfoweb.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन अपलोड करावा. तूर व उडीद डाळींची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या आस्थापनेविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये कडक करावाई करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी कळवले आहे.

Back to top button
error: Content is protected !!