महाराष्ट्र
Trending

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सहाय्यकाने लाच मागितली ! शेतरस्त्याच्या अर्जावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी मागितले १० हजार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – शेतरस्त्याच्या अर्जावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकांनी दहा हजारांची लाच मागितली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. स्वाती ज्योतीराम खताळ (महसुल सहाय्यक (वर्ग 3), जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक 292 मधील क्षेत्रासाठी शेतरस्ता मिळणे कामी तहसील कार्यालय उस्मानाबाद येथे अर्ज दाखल केला होता. दाखल केलेल्या या अर्जाच्या अंतिम निकालावर तहसीलदार यांची स्वाक्षरी घेऊन निकाल देणे कामी यातील आरोपी यांनी 10,000/- रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले होते.

त्यानंतर यातील आरोपींना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्या कडून लाच रक्कम घेण्यास नकार दिला. दरम्यान, आज आरोपी विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 21/06/2023, 26/06/2023, 17/07/2023 या तीन तारखांना लाचमागणी पडताळणी करण्यात आली.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि.उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – विकास राठोड, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोलीस अंमलदार, मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे,सचिन शेवाळे (ला.प्र.वि. उस्मानाबाद) यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!