वैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील मनेगावमध्ये दरोडा, नाकाबंदीदरम्यान कोपरगावचे दोन आरोपी गळाला !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – वैजापूर तालुक्यातील मनेगावमध्ये दरोडा टाकून पसार झालेल्या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. नाकाबंदीदरम्यान कोपरगावचे दोन आरोपी पोलिसांच्या गळाला लागले. त्यांच्या ताब्यातून धारदार शस्र जप्त करण्यात आले आहे. १) सागर रतन भोसले वय २० वर्षे रा. पडेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर २) रावसाहेब भीमराव पगारे वय ३५ वर्षे रा. पडेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दिनांक ०८/११/२०२३ रोजी पोस्टे शिऊर हददीत मौजे मनेगाव (ता. वैजापूर) येथे आठ ते दहा अनोळखी दरोडेखोरांनी शेतवस्तीवर धारदार हत्यारानीशी दरोडा टाकून माराहण करुन घरातील सोन्या, चादीचा ऐवज घेवून पसार झाले. ही माहिती मिळताचा पोलिस ठाणे शिऊर येथील पथकाने नाकाबंदी लावली. अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत असताना दोन आरोपी १) सागर रतन भोसले वय २० वर्षे रा. पडेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर २) रावसाहेब भीमराव पगारे वय ३५ वर्षे रा. पडेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांना धारदार हत्यारासह शोधण्यात पोलिसांना यश आले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनिषा कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलीस अधिक्षक महक स्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वैजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे शिऊर येथील प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक, संदीप पाटील, पोहेकॉ राहुल थोरात, पोहेकॉ अमृता ठोके, पोलीस अमंलदार विशाल पैठणकर, भरत कमोदकर, संभाजी आंधळे, महिला पोलीस अमलदार श्रध्दा शेळके यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!