छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात तिघे ठार, दोघे जखमी ! जालन्याहून शिर्डीकडे जाताना चालकास डुलकी लागल्याने कार कठड्यावर घडकली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात तिघे ठार तर दोघे जखमी झाले. जालन्याकडून शिर्डीकडे जात असताना चालकास डुलकी लागल्याने कार कठड्यावर घडकून हा अपघात झाला. मृत व जखमी गुजरात राज्यातील सुरतचे आहेत. एमर्जन्सी गेट खालील कठड्यावर कार आदळून हा भीषण अपघात झाला.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि 24.05.2023 रोजी सकाळी 05.45 वाजेच्या सुमारास कंट्रोलने फोनद्वारे माहिती दिली की चैनल क्रमांक 404 समृद्धी महामार्ग येथे कारचा अपघात झाला आहे. ही माहिती मिळताच पोलिस पथक रवाना होऊन घटना स्थळी तातडीने पोहचले.

कार (क्र GJ 05RN 8450) ही जालन्याकडून शिर्डीकडे जात असताना चालकास डुलकी लागल्याने एमर्जन्सी गेट खालील कठड्यावर कार आदळून भीषण अपघात झाला. कार मधील 5 व्यक्ति पैकी 3 जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतुक पूर्णपने सुरळीत करण्यात आली.

या अपघातात 1. श्रीनिवास गौड (वय 38 रा सूरत) 2. कृष्णा गौड (वय 39 रा सूरत) व 3. संजीव गौड (वय 46 रा सूरत) यांचा मृत्यू झाला. तर 4.सुरेश गौड (वय 39 रा सूरत) व 5. भार्गव गौड (वय 18 रा सूरत) हे दोघे जखमी झाले.

Back to top button
error: Content is protected !!