महाराष्ट्र
Trending

सरपंच, ग्रामसेवक लाच घेताना जाळ्यात ! पाच हजार घेऊन दुचाकीवरून पळून जात असताना ग्रामसेवकाला झडप घालून पकडले !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल योजना लाभ मिळावा यासाठी आठ हजारांची मागणी करून  तडजोडी अंती पाच हजारांची लाच घेतांना सरपंच व ग्रामसेवकाला पकडण्यात आले. सापळा कार्यवाही असल्याचे लक्षात येताच पाच हजार घेऊन मोटारसायलने धूम ठोकत असताना पथकाने ग्रामसेवकाला झडप घालून पकडले.

ज्योती खंडेराव पवार (वय ४० वर्ष, पद सरपंच, ग्रामपंचायत मौ. सलगरा (खुर्द),ता. मुखेड, जि. नांदेड), शांताराम देविदास गवई (वय ५२ वर्षे, ग्रामसेवक, मौजे सलगरा (खुर्द) तालुका मुखेड जि.नांदेड, रा. भोकर) अशी आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या आईच्या नांवाने मौजे सलगरा (खुर्द) येथे कच्चे घर असून रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल योजना लाभ मिळावा याकरीता तक्रारदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय मौ. सलगरा (खुर्द) येथील सरपंच ज्योती पवार यांना त्या संदर्भात भेटले. तुमच्या घरकुल योजनेचा प्रस्ताव मंजुर करावायाचा असेल तर ५०००/- रुपये द्यावे लागतात, अशी लाचेची मागणी त्यांनी केली.

दिनांक १३.०५.२०२३ रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही दरम्यान सरपंच ज्योती पवार यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी करुन आरोपी  शांताराम देविदास गवई यांनी तक्रारदार यांना घरकुलासाठी ८००० /- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती . ५०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी ज्योती पवार यांनी पंचाचे समक्ष लाच स्वीकारली व ग्रामसेवक शांताराम गवई यांच्या मोटारसायकलने पळून जात असताना सापळा पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना पकडले. त्यांच्या ताब्यातुन लाचेची रक्कम ५००० /- रुपये जप्त करण्यात आली असून दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन मुखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेडचे डॉ श्री राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक यांच्या पर्यवेक्षणात पोलीस उप अधिक्षक अशोक इप्पर, पोलीस निरीक्षक स्वप्नाली धुतराज, पोहेकॉ / मेनका पवार, पोकॉ/ कुलथे, पोकॉ / सयद खदिर, चापोना / प्रकाश मामुलवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड युनिट यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!