छत्रपती संभाजीनगर
Trending

सावंगीतील देशी दारूच्या दुकानाचा प्रयत्न सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी हाणून पाडला ! यशराज टॉवर्समध्ये वॉईन शॉपला जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई हुकूम !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – छत्रपती संभाजीनगरची वेस म्हणून ओळख असलेल्या व अल्पावधितच जिल्ह्याच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या नकाशावर भरभराट होत असलेल्या सावंगी गावात देशी दारूचे दुकान सुरु करण्याचा डाव सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मिळून एकजुटीने हाणून पाडला. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) क्रांतीचौक उड्डाणपूल रुंदीकरणात बाधीत झालेले देशी दारूचे दुकान यशराज टॉवर्समध्ये स्थलांतरित करण्यास जिल्हाधिकारी यांनी मनाई हुकूम पारित केला आहे.

यासंदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे की, श्रीमती. वर्षा वसंत होजवाला, सीएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ०८ क्रांती चौक, औरंगाबाद ही अनुज्ञप्ती उड्डाणपुलाच्या रोड रुंदीकरणात बाधित झाली असल्याने अनुज्ञप्तीधारक यांनी त्यांचे अर्ज दिनांक ११-०२-२०२२ अन्वये सदर सीएल-३ अनुज्ञप्ती शॉप क्रमांक एल-२ व एल-३ गट क्रमांक १६७ पी. १६८ पी. २११ पी यशराज टॉवर सावंगी ता. जि. औरंगाबाद या ठिकाणी स्थलांतरीत करणे करीता विनंती केली होती. सदर प्रस्तावीत जागा महाराष्ट्र देशी मद्य अधिनियम १९७३ चे नियम २४ (४) (बी) (सी) व नियम २५ (d) (iv) नुसार अंतरनिर्बंध मुक्त आहे. तसेच सदर सीएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ०८ ची जागा क्रांतीचौक ता. जि. औरंगाबाद येथे झालेल्या उड्डाणपुलाच्या रोड रुंदीकरणात बाधित झाली असल्याने व अनुज्ञप्तीचे स्थलांतर त्याच जिल्हयात होत असल्याने महाराष्ट्र देशी दारु नियम १९७३ चा नियम २५ (d) च्या परंतुकानुसार नियम २५ (d) (I) (I) (III) मधील मद्यविक्री कमी असणे, मद्यपीची गैरसोय होणे व ग्रामसभा व ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असणे या अटीची पुर्तता करण्याची आवश्यकता नाही असे असे उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुख्यालय औरंगाबाद यांनी अहवाल सादर केलेला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांनी दिनांक ३१-०३-२०२३ रोजी सदर अनुज्ञप्तीस शॉप क्रमांक एल-२ व एल-३ गट क्रमांक १६७ पी. १६८ पी. २११ पी यशराज टॉवर सावंगी ता.जि. औरंगाबाद येथे स्थलांतर करण्यास परवानगी दिलेली आहे. सदर अनुज्ञप्ती प्रस्तावीत ठिकाणी कार्यरत झालेली आहे. तदनंतर सदर सीएल-३ अनुज्ञप्ती स्थलांतरास तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सदर तक्रार अर्ज चौकशी करीता निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, क विभाग औरंगाबाद यांना देण्यांत आले असता निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, क विभाग यांनी चौकशी करून अहवाल सादर केलेला आहे. सदर अहवालात असे नमुद केलेले आहे की, तक्रारदार यांचे अर्ज / निवेदनानुसार सदर सीएल-३ अनुज्ञप्ती व्यवहार सुरु करण्यासाठी प्रखर विरोध आहे.

सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरचे प्रकरण जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांचे समक्ष सुनावणी अंती सदरील प्रकरण निकाली काढण्यांत यावे अशी कार्यालयाची धारणा असल्याचा अहवाल सादर केल्यामुळे दिनांक १३-०६-२०२३ रोजी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांच्या दालनामध्ये सुनावणी ठेवण्यात आलेली होती. सदर सनावतीत अनुज्ञप्तीधारकाच्या वतीने अॅड. भास्कर गोणारे, तक्रारदार श्री. शेख कदीर सरपंच सावंगी व ग्रामस्थ यांचे वतीने अॅड. आवटे उमाकांत तसेच यशराज टॉवर्स सावंगी यांचे वतीने अॅड.ए.एम. उंद्रे हे उपस्थित होते.

सदर सुनावणीमध्ये ग्रामसेवक, सरपंच तक्रारदार यांनी त्यांचे म्हणणे सादर केलेले आहे की, सदर देशी दारु दुकानास विरोध असल्याने मौ. सावंगी गावातील ४२०० पैकी ३२०० मतदारांनी स्वाक्षरी करून निवेदन दिलेले आहे. अनुज्ञप्तीधारकाने ग्रामपंचायत कार्यालय, सांवगी येथे सदर देशी दारु दुकान स्थलांतरासाठी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केलेली नाही. ग्रामपंचायत कार्यालय, सांवगी यांनी सदर देशी दारू दुकानाबाबत कोणताही ग्रामसभेत ठराव मंजूर केलेला नाही.

मौ. सावंगी येथील संत कबीर मठ मंदिर हे देशी दारू दुकानापासून अंतर कमी आहे आणि ते धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहे. त्यामुळे सदर दुकानास विरोध आहे. निवासी जागेतील देशी दारु दुकान म्हणजेच यशराज टॉवर्स कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. सावंगी या नावाने ओळखल्या जाणा-या हाउसिंग सोसायटी मध्ये देशी दारू दुकानास चालू करण्यास दिलेला आदेश हा अयोग्य आहे. सार्वजनिक हित, इतर महिला दुकान मालक आणि गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवाशांचे हित लक्षात घेता देशी दारु दुकानास देण्यांत आलेली परवानगी रद्द करुन सदर देशी दारु दुकान सावंगी गावाच्या बाहेर हलविण्याचे आदेश देण्यांत यावे असे विनंती केलेली आहे. देशी दारू दुकानदार व ग्रामस्थ या दोघांचा युक्तीवाद ऐकून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी ग्रामस्थांच्या बाजूने निकाल दिला.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या प्रकरणी असा निष्कर्ष काढला आहे की, श्रीमती. वर्षा वसंत हौजवाला, सीएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ०८ क्रांती चौक, औरंगाबाद ही अनुज्ञप्ती शॉप क्रमांक एल-२ व एल-३ गट क्रमांक १६७ पी, १६८ पी, २११ पी यशराज टॉवर सावंगी ता.जि. औरंगाबाद या ठिकाणी स्थलांतरीत करणे करीता दिनांक ३१-०३-२०२३ रोजी मंजूरी दिली असली तरी मौ. सावंगी ता. जि. औरंगाबाद येथील स्थानिक नागरिक, सरपंच, ग्रामसभेतील सदस्य तसेच मौ. सावंगी गावातील ४२०० पैकी ३२०० मतदांराचा देशी दारु दुकानास तीव्र विरोध आहे. यामुळे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, क विभाग औरंगाबाद यांनी दिनांक २८-०४- २०२३ अन्वये सदर देशी दारु दुकानास स्थानिक लोकाचा विरोध व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही असा अहवाल सादर केला असल्याने व मौ. सावंगी गावातील सार्वजनिक व गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवाशांचे हित लक्षात घेता श्रीमती. वर्षा वसंत होजवाला, सीएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ०८ शॉप क्रमांक एल-२ व एल-३ गट क्रमांक १६७ पी, १६८ पी, २११ पी यशराज टॉवर, सावंगी ता. जि. औरंगाबाद ही अनुज्ञप्ती इतरत्र स्थलांतर करण्यात यावा, असा निष्कर्ष जिल्हाधिकारी यांनी काढला आहे.

याप्रकरणात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे की, वस्तुस्थिती व निष्कर्ष लक्षात घेता, असे आदेश देण्यात देण्यात येत आहेत की, श्रीमती. वर्षा वसंत हौजवाला, सीएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ०८ क्रांती चौक, औरंगाबाद ही अनुज्ञप्ती शॉप क्रमांक एल-२ व एल-३ गट क्रमांक १६७ पी. १६८ पी. २११ पी यशराज टॉवर सावंगी ता.जि. औरंगाबाद या ठिकाणी स्थलांतरीत करणे करीता दिनांक ३१-०३-२०२३ रोजी मंजूरी दिली असली तरी मौ. सावंगी ता.जि. औरंगाबाद येथील स्थानिक नागरिक, सरपंच, ग्रामसभेतील सदस्य तसेच मौ. सावंगी गावातील ४२०० पैकी ३२०० मतदाराचा देशी दारू दुकानास तीव्र विरोध दिसल्यामुळे व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, क विभाग औरंगाबाद यांनी दिनांक २८-०४-२०२३ अन्वये सदर देशी दारू दुकानास स्थानीक लोकाचा विरोध व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारत येत नाही असा

अहवाल सादर केला असल्याने व मौ. सावंगी गावातील सार्वजनिक व गृहनिर्माण सोसायटीच्या रहिवाशांचे हित लक्षात घेता श्रीमती. वर्षा वसंत हौजवाला, सीएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ०८ शॉप क्रमांक एल-२ व एल-३ गट क्रमांक १६७ पी, १६८ पी, २११ पी यशराज टॉवर, सावंगी ता.जि. औरंगाबाद या ठिकाणी चालू न करता नियमातील तरतुदी नुसार इतर ठिकाणी स्थलांतर करणे बाबत अनुज्ञप्तीधारकांने अर्ज करावा. अनुज्ञप्तीधारकांने तसे स्थलांतरा करीता अर्ज केल्यावर महाराष्ट्र देशी दारु नियम १९७३ मधील नियमातील तरतूदी नुसार कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी  आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!