शिवानंद टाकसाळे यांची राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक !
मुंबई, दि. २० – प्रशासकीय सेवेतील दांडगा अनुभव असलेल्या शिवानंद टाकसाळे, भा.प्र.से. (सेवानिवृत्त) यांची राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कंत्राटी तत्त्वावर नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. परिविक्षाधीन तहसिलदार, धानोरा व परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी, धानोरा, जि. गडचिरोली येथील कार्यकाळात त्यांनी उल्लेखनीय काम केल्याची शासन दप्तरी नोंद यापूर्वीच घेतलेली आहे. याशिवाय शासनाच्या सर्व योजना शिधावाटप, जातीचे दाखले वाटप करणे आदी कामे आदिवासी नक्षलग्रस्त भागात त्यांनी प्रभावीपणे केले आहे. चंद्रपूर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम करत असताना वरोरा येथे बाबा आमटे यांनी कृष्ठरोगी रुग्णांसाठी उभारलेल्या आनंदवनातील रुग्णांना दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिका मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून त्या शिधापत्रिका देण्यास त्यांनी मंजूरी प्राप्त करून घेतल्याचे उल्लेखनीय कामही त्यांनी केलेले आहे.
राज्य शासनाची महत्त्वाकाक्षी योजना असलेली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेचे सनियंत्रण व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद प्रशासकीय दृष्टया अतिशय महत्त्वाचे आहे. शिवानंद टाकसाळे, भा.प्र.से. हे दि.२८.०२.२०२३ (म.नं.) रोजी शासन सेवेतून नियत वयोमानानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. शिवानंद टाकसाळे यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा विचार करता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत राबविण्यात येत असलेल्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमेतचा फायदा होणार आहे, ही बाब विचारात घेऊन शासन निर्णयातील तरतुदींनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी या पदावर कंत्राटी तत्त्वावर शिवानंद टाकसाळे, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शिवानंद टाकसाळे, भा.प्र.से. (सेवानिवृत्त) यांची या १७ मे रोजी काढलेल्या आदेशान्वये एक वर्षांच्या कालावधीकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी या पदी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe