छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

वैजापूर तालुक्यातील झेडपीच्या प्रभारी मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस, शाळेच्या ग्रुपवर आक्षेपार्ह मॅसेज टाकण्यासह १७ आरोप ! संबंधित शिक्षकाने आरोप फेटाळले, हे तर मला बदनाम करण्याचे षडयंत्र !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या (जरुळ, केंद्र आघूर) प्रभारी मुख्याध्यापकाला (सहशिक्षक) वैजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एकूण १७ आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित प्रभारी मुख्याध्यापकाने आरोप फेटाळले असून हे तर मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. महिला शिक्षकांना हताशी धरून हा प्रकार घडवून आणला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महिला शिक्षीकांनी केलेल्या तक्रारीवरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसध्ये एकूण १७ आरोपांवर संबंधित शिक्षकाकडून खुलासा मागवला आहे.

हे आहेत आरोप…

1.परिपाठ चालू असताना महिला शिक्षिकांना अपमानास्पद बोलणे,
2 मनमानी प्रशासन चालवणे,
3. वारंवार महिला शिक्षिकांना कामाशिवाय ऑफिसमध्ये बोलावणे.

4. शालेय कामकाज करताना महिला शिक्षकांसोबत सतत दादागिरीची भाषा वापरणे.
5. टाचण वही, हजेरी इत्यादी वर सही घेण्यास गेल्यानंतर नंतर या असे सांगणे / बराच वेळ उभे ठेवणे.
8. शाळेच्या ग्रुपवर आक्षेपार्ह मॅसेज टाकणे. रात्री मॅसेज टाकणे सकाळी डिलीट करणे.

7 स्वतः ऑफीसमध्ये बसून राहणे वर्गावर न जाणे.
8. जोड वर्ग घ्या सांगणे व स्वतः सतत फोनवर बोलणे,
9. महिला शिक्षिका शिकवत नाहीत असा गावात प्रचार करणे.

10. महिला शिक्षिकांनी एखादया मुद्यावर मत मांडल्यास विरोध करणे, गावातील व्यक्तिला चिथावणी देवून दबाव निर्माण करणे.
11. मी सांगेल तोच कायदा या पध्दतीने वागणे, हुकुमशाही करणे.
12. रजा घेताना महिला शिक्षकांच्या बाबतीत अडवणूक करणे.

13. शाळेत वेळेवर न येणे व जाणे, हालचाल न भरता गैरहजर राहणे नंतर सहया करणे
14. शाळेत गुटका सदृश्य पदार्थ खाणे ऑफीसमध्ये झोपून राहणे.
15. बरेचसे शालेय कामकाज वाटप करून दिलेले असताना वर्गावर न जाणे.

16. मी काहीही केले तरी माझे कोणीही काहीही करु शकत नाही, अशा धमक्या वारंवार देणे
17. शाळेच्या आर्थिक बाबी, नैतिक बाबी या संदर्भानेही संशयास्पद वर्तन असणे.

या आरोपासंदर्भात वैजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटिसीमध्ये म्हटले आहे की, आपणाविरुद्ध केलेले आरोप गंभीर असून सदरील बाब ही कार्यालयीन शिस्त व वर्तुणूकीचा भंग करणारी असल्याने आपणास जबाबदार धरून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चा भंग केल्यामुळे आपणाविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येवू नये ? या बाबत वरील मुद्द्यानिहाय आपला खुलासा ही नोटीस मिळाल्यापासून पाच दिवसांच्या आत पुराव्यासह सादर करावा. खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा समाधानकारक नसल्यास आपणाविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असेही वैजापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनी म्हटले आहे.

Back to top button
error: Content is protected !!