महाराष्ट्र
Trending

नव्या संसर्गजन्य साथीचा राज्यात चंचूप्रवेश, कुंभकर्णी झोपेतील “गतिमान सरकार” म्हणाले, नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू !

- मंत्री उदय सामंत

मुंबईदि. 24 : मुंबई शहरात संसर्गजन्य साथीच्या आजारावरील उपचारासाठी सध्या कस्तुरबा रुग्णालय उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी नवीन रुग्णालयासाठी जागेचा शोध सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधान परिषदेत सदस्य विलास पोतनीस यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून म.वि.प. नियम ९२ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता.

 मंत्री श्री. सामंत म्हणाले कीज्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा अभाव आहे, तिथे आरोग्य सुविधा देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयासारखेच आणखी एका रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. जिथे जागा उपलब्ध असेल त्यापैकी योग्य जागेचा पर्याय शोधला जाईल.

या चर्चेत सदस्य सुनील शिंदेसचिन अहिरमहादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!