१६ आमदरांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस ! उद्धव ठाकरे गटाला काहीसा दिलासा !!
नवी दिल्ली, दि. १४ – गेल्या एक वर्षांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या मागील आदेशाची अंमलबजावणी विधानसभा अध्यक्षाने केली नसून त्यांना निकाल देण्याचे निर्देश द्यावे, या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या याचिकावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन आठवड्याच्या आत म्हणने मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. या आदेशामुळे ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
मागील एक वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडून एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत घरोबा करून सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी निकाल दिला. १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेवर वेळेत निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
सर्वोच्च न्यायालयााच्या या आदेशानुसार ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाद मागितली. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे यासंदर्भात अर्जाच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, १६ आमदारांच्या अपात्रतेवर निकाल देण्यास उशीर होत असल्याचा आक्षेप नोंदवत ठाकरे गट पुन्हा ३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयात यावर आज, १४ जुलै रोजी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बाजवली असून दोन आठवड्यात म्हणने मांडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला असून लवकरच निर्णय लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष उशीर करत आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून त्यांना योग्य ते निर्देश द्यावे, या आशयाची याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यामुळे पुन्हा एकदा सत्तासंघर्षाने वेग घेतला आहे. दरम्यान, मला अद्याप सर्वोच्च न्यायालयाची नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यानंतर तीचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करू, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिली.
शिंदे गटाच्या या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार
१. एकनाथ शिंदे
२ .संदीपान भुमरे
३. तानाजी सावंत
४. रमेश बोरणारे
५. अब्दुल सत्तार
६. लता सोनवणे
७. अनिल बाबर
८.भरत गोगावले
९.यामिनी जाधव
१०. बालाजी कल्याणकर
११. बालाजी किणीकर
१२. चिमणराव पाटील
१३. महेश शिंदे
१४. संजय रायमूलकर
१५. संजय शिरसाट
१६. प्रकाश सुर्वे
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe