छत्रपती संभाजीनगर
Trending

ब्लॅकमेलिंग करण्यासाठी गुंडांनी बनवल्या गँग, औद्योगिक परिसरातील कंपन्यांकडून खंडणी वसुलीचा धंदा जोमात ! खासदार इम्तियाज जलील यांनी थोपटले दंड, प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कोर्टात !!

ब्लॅकमेलिंग करणार्‍यांवर तात्काळ कारवाई करा; खासदार इम्तियाज जलील यांचे DIG, CP व SP ना पत्र

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १० : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक परिसरात असलेल्या कंपन्यांना काही समाजकंटक, गुंडागर्दी व ब्लॅकमेलिंग करणारे लोक विविध मार्गाने कंपन्यांना बदनाम करून पैसे उकळण्यासाठी विविध शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी देत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी थेट विशेष पोलीस महानिरिक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे ब्लॅकमेलिंग करणारे विरोधात उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करणेबाबत पत्र दिले आहे.

औद्योगिक परिसरातील बिडकीन चितेगाव येथील एका नामवंत कंपनीकडून पैसे उकळण्यासाठी काही जण कंपनीच्या विरोधात विविध शासकीय कागदपत्रात खाडाखोड करून तक्रारी देत असल्याचे प्रकरण सद्यस्थितीत सुरु असतानाच जिल्ह्यातील इतरही कंपन्यांना अशाच प्रकारे नाहकत्रास देणे सुरु असल्याचे अनेक प्रकरणे निदर्शनास येत असल्याचा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा, स्थानिक युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हावे या करिता जिल्हा व राज्य शासनाच्या वतीने विविध उपाय योजना राबवून नामवंत कंपन्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या औद्योगिक परिसरात यावे याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

परंतु काही समाजकंटक, गुंडागर्दी व ब्लॅकमेलिंग करणारे लोक विविध मार्गाने कंपन्यांना बदनाम करून पैसे उकळण्यासाठी विविध शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी देत असल्याचे अनेक प्रकरण निदर्शनास येत आहे. अनेक ठिकाणी तर कंपन्यांकडून पैसे उकळण्यासाठी काही गुंडांनी गँग सुध्दा बनविल्याची माहिती मिळत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!