छत्रपती संभाजीनगर
Trending

नाटयशास्त्र विभागातच चित्रपटाचा अभ्यासक्रम शिकवा: दिग्दर्शक शिवदर्शन कदम

संभाजीनगर लाईव्ह, दि.३ : मराठी नाट्य सृष्टीने चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांना अनेक नामवंत कलावंत दिले आहेत. बदलत्या काळानूसार या विभागात चित्रपटासंदर्भात अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक शिवदर्शन कमद यांनी केले. प्रख्यात दिग्दर्शक शिवदर्शन कदम यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयशास्त्र विभागात २ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान ४७ वा एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटयशास्त्र विभागात मास्टर्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस् या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा हा भाग असून या एकांकिका महोत्सवात बी.पी.ए. या अभ्यासक्रमाच्या तिनही वर्षांचे विद्यार्थी आणि एम.पी.ए.तृतीय सत्र तसेच बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

४७ व्या एकांकिका महोत्सवाचे उद्घाटन नाटयशास्त्र विभागात सोमवारी सांयकाळी (नाटय चित्रपट दिग्दर्शक शिवदर्शन कदम मराठी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले हे होते. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, विभागप्रमुख डॉ.स्मिता साबळे यांची उपस्थिती होती.

उद्घाटनानंतर आपले मनोगत वक्त करताना शिवदर्शन कदम म्हणाले, विद्यापीठाचा नाटयशास्त्र विभाग हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व अभिव्यक्तिला अवकाश देणारा विभाग आहे. बदलत्या काळानुसार नाटक आणि सिनेमा अशा भेद न करता या दोन्ही कलांचा एकत्रित अभ्यासक्रम राबवण्याचा प्रयत्न करावा. यावेळी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, नाटयशास्त्र विभागाला देशाला नामवंत कलावंत, दिग्दर्शक दिले आहेत. मराठवाडायातील या कलावंताना राज्य, राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी संधी देऊ, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.

१९ एकांकिका सादर होणार
नाटयशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिगदर्शित केलेल्या १९ एकांकिका महोत्सवात सादर होणार आहेत. महोत्सवात सादर होणा-या एकांकिका दिग्दर्शक पुढीलप्रमाणे  अल्प भूधारक (गोपाल वाघमारे/ अश्विनी देहाडे), भेडिए (इयान खान), खटला (शाम डुकरे), मानस (संकेत निकम), व्हाय मी (तेजस कवर), डाग (तेज कवर),  कॅनव्हास की मौत (अश्विजीत भिन्ने), मुक्ती (मानसी राठोड/ पंकज गिरी), पत्र (पवन खरात),  आदीम (अक्षय राठोड), कलकी ( संगीता नाटकर),  कारखाना (नंदू वाघमारे),  सर्जरी (रुमा भामरी), लज्जा द्यावी सोडून (विठ्ठल बोबडे),  माय (संतोष शेटये),  दूर्गा (दूर्गेश्वरी अंभोरे), भारतीय (आदीत्य इंगळे), पछाडलेला (सुदाम केंद्रे), शवागाराचा चौकीदार (नयना टेंभूणें) आदी.

विभागाच्या आजपर्यंच्या वाटचालीला आढावा विभागप्रमुख डॉ.स्मिता साबळे यांनी प्रास्ताविकात घेतला. प्रास्ताविकात डॉ.गजानन दांडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ.वैशाली बोधले यांनी सूत्रसंचालन तर डॉ.अशोक बंडगर यांनी आभार मानले. या प्रसंगी एकांकिका महोत्सवातील प्रयोगांचे परिक्षण करण्यासाठी डॉ.ज्ञानदा कुलकर्णी त्याचप्रमाणे विभागातील प्रा.गजानन दांडगे, डॉ.रामदास ढोके, डॉ.सुनिल टाक, प्रा.विशाखा शिरवाडकर, जाई कदम, डॉ.अमजद सय्यद, डॉ.वाघमारे, डॉ.गौतम अडागळे आणि आदींची उपस्थिती होती.

Back to top button
error: Content is protected !!