महाराष्ट्र
Trending

जालन्याच्या अट्टल घरफोड्यास चित्तथरारक पाठलाग करून पकडले, मंठ्याच्या सराफाला विकले सोने ! औरंगाबाद, जालना, नाशिक, जळगावमध्ये घातला होता धुमाकूळ, कन्नडची दुचाकी हस्तगत !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – तब्बल २६ पोलिस स्टेशनला हवा असलेला आणि पाच जिल्ह्यांत धूमाकूळ घालणार्या आरोपीला औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून पकडले. बीड बायपास केंब्रीजपासून सुरु झालेला हा चित्तथरारक पाठलाग लाडगाव टोलनाक्यापर्यंत सुरु होता. अखेर लाडगाव टोलनाक्यावर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले. आरोपीकडून घरफोडीचे ५ गुन्हे उघडकीस आले असून ज्या मोटारसाकलवर ते धूम स्टाईल पळत होते ती मोटारसायकलही कन्नड तालुक्यातील चोरीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजेंद्र उर्फ राजन बाबासाहेब राऊत (राजु बाबुराव मुचकुले, वय 26 वर्षे, रा. साई मंदिराच्या पाठीमागे, साईनगर, परतूर जि. जालना), ओम फकीरा पवार (वय 20 वर्षे, रा. ओमसाई मेडिकल जवळ, परतुर गाव ता. परतुर जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेंद्र उर्फ राजन बाबासाहेब राऊत याच्यावर २६ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सुमारे एक ते दीड महिन्यापासून गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक अजित दगडखैर, पोउपनि अमोल म्हस्के यांच्या सोबतचे पथक औरंगाबाद शहरामध्ये दिवसा घरफोडी करणारे आरोपींकरीता शहरात व इतर ठिकाणी सापळा लावून थांबलेले असताना दिनांक 09/02/2023 रोजी त्यांच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की औरंगाबाद शहरात दिवसा घरफोड्या करणारे दोघे जण हे काळ्या रंगाच्या लाल पट्टा असलेल्या बजाज पल्सर या मोटार सायकलवर सध्या शहरात फिरत आहेत.

ते दोघे सध्या बीड बायपास मार्गे शहराच्या बाहेर निघालेले आहे. त्यावरून पोउपनि अजित दगडखेर बीडनाका येथे सापळयाच्या नियोजनात हजर होते. थोड्याच वेळात ते दोघे त्यांच्या समोरुन पास झाले. पोउपनि अजीत दगडखैर यांनी पोउपनि अमोल म्हस्के यांना व सापळ्यामध्ये हजर असलेल्या सर्वांना त्या दोघांचे वर्णन कळवून ते त्यांचा पाठलाग करित असल्याचे कळवले. त्यानंतर त्या दोघांनी त्याची मोटार सायकल जोरात झाल्टा फाटा ते केंब्रीज हायस्कूल मार्गे जालन्याच्या दिशेने अतिशय वेगाने निघाले असल्याची माहीती लाडगाव टोलनाक्यावर सापळा लावून थांबलेल्या पथकास देण्यात आली.

त्यांनी टोल नाक्यावर यापूर्वीच लावलेल्या सापळयामध्ये ते दोघे पकडल्या गेले तोपर्यंत पाठलाग करणारे इतर पथकही पोहचले. त्यांना सदर ठिकाणी ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवून त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे राजेंद्र उर्फ राजन बाबासाहेब राऊत (राजु बाबुराव मुचकुले, वय 26 वर्षे, रा. साई मंदिराच्या पाठीमागे, साईनगर, परतूर जि. जालना), ओम फकीरा पवार (वय 20 वर्षे, रा. ओमसाई मेडिकल जवळ, परतुर गाव ता. परतुर जि. जालना) असे सांगीतले. त्यांना औरंगाबाद शहरात येण्याचे व फिरण्याचे कारण विचारता त्यांनी उडवाडवीचे उत्तरे देत खरे सांगण्यास टाळाटाळ केली.

त्यांना अधिक विश्वासात घेऊन दिवसा झालेल्या घरफोड्या बाबत विचारपुस करता त्यांनी घरफोडी केल्या असल्याची कबुली दिली. तांत्रिक पुराव्यावरुन त्यांनी १) पो. ठाणे जवाहरनगर 2) पो. ठाणे जवाहरनगर  3) पो. ठाणे पुंडलिकनगर 4) पो. ठाणे जवाहरनगर 5) पो.ठाणे क्रांतीचौक या पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले व चोरी केलेले दागिणे हे मंठा (जि. जालना) येथील सोनार ज्ञानेश्वर बाबासाहेब कळणे व मंठा येथील आणखी एका सोनारास विक्री केलेबाबत सांगितले.

त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल बाबत विचारता त्यांनी सदर मो.सा. ही पड़ेगाव भागातून चोरली असल्याचे सांगितले. त्याबाबत अभिलेखाची तपासणी करता पो. ठाणे छावणी येथे किर्तीमंत अभिमन्यू मगरे (रा. ताडपिंपळगाव ता. कन्नड जि. औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरुन पो. ठाणे क्रांतीचौक येथे गुन्हा दाखल असल्याचे अभिलेखावरुन स्पष्ट झाले. त्यांनी आदी गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने त्यांना पो.ठाणे जवाहरनगर यांच्या स्वाधीन करण्यात आले.

राजेंद्र उर्फ राजन बाबासाहेब राऊत (राजु बाबुराव मुचकुले) वय 26 वर्षे, धंदा- मजुरी रा. साई मंदिराच्या पाठीमागे, साईनगर, परतुर जि. जालना या रेकर्डवरील आरोपी असुन त्याचे विरुध्द जालना, औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव येथे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळून आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश आघाव, पोउपनि अजित दगडखैर, पोउपनि अमोल म्हस्के, सफौ/सतीश जाधव, पोह सुधाकर मिसाळ, पोना संदीप तायडे, पोना संजय नंद, पोना संजयसिंग राजपुत, पोना विठ्ठल सुरे, पोना नवनाथ खांडेकर, पोअं सुनील बेलकर, पोअं संदीप राशिनकर, पोअं अजय दहीवाल, पोअं विजय घुगे, पो अं धनंजय सानप, मपो अं संजीवनी शिंदे, चा. पोना  तातेराव शिनगारे सर्व नेमणुक गुन्हे शाखा, औरंगाबाद शहर यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!