महाराष्ट्र
Trending

आदर्शचा २०० कोटींचा घोटाळा उघड होवून ९० दिवस झाले, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांना उशीरा जाग, म्हणाले नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार !! गुन्हा दाखल होवून तीन महिने उलटले, आतापर्यंत ठेवीदार मृतांचे आकडे मोजत होता का ?

ठेवीदारांच्या बाजूने कुठलीही ठोस भूमीका न घेता मोघम आश्वासन देवून राज्य सरकारने एकप्रकारे राज्यात होत असलेल्या पतसंस्थांमधील घोटाळ्यातून हात झटकले

मुंबई, दि. ११ : संपूर्ण राज्यातील सहकार क्षेत्राला जबरदस्त झटका देणार्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा २०० कोटींपेक्षा मोठा घोटाळा उघड होवून तब्बल तीन महिने म्हणजेच ९० दिवस उलटून गेल्यानंतर आताकुठे राज्याचं मंत्रालय अन् सहकार मंत्री झोपेतून जागे झाले अन् म्हणाले नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार. मुळात छत्रपती संभाजीनगर येथे १६ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या मराठावाडा मंत्रिमंडळ बैठकीवर ठेवीदारांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाला सहजासहजी सहकारमंत्री सामोरे गेले नाही. खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर व ठेविदार आणि पोलिसांची बॅरिगेट्सवर ढकलाढकली झाल्यानंतर मंत्रीमोहदय मोर्चेकर्यांना सामोरे गेले होते. त्यानंतर आज, ११ ऑक्टबर २०२३ रोजी सहकारमंत्री दिलीप वळसे यांनी मंत्रालयात बैठक घेवून ठेवीदारांच्या तोंडाला एकप्रकारे पानेच पुसली. राज्य सरकारने या प्रकरणात ठेवीदारांच्या बाजूने कुठलीही ठोस भूमीका न घेता नेहमीप्रमाणे नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार, असे मोघम आश्वासन देवून राज्य सरकारने एकप्रकारे राज्यात होत असलेल्या पतसंस्थांमधील घोटाळ्यातून हात झटकले. ठेवीदारांचे जीव चालले आहे अन् गुन्हा दाखल होवून तब्बल ९० दिवस झाल्यानंतर सरकार अन् मंत्रिमहोदय म्हणतात की, नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार. म्हणजे तुम्ही चर्चा करणार. अजून चर्चासुध्दा केली नाही का ? तीन महिने का ठेवीदारांच्या मृत्यूचे आकडे मोजत होता का ? असा संतप्त सवाल ठेवीदार उपस्थित करत आहे.

नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी- सेवा उपलब्ध करून देतात. परंतु राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत आहेत. या बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती गठीत करावी, असे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात नागरी सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत वळसे पाटील बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री वळसे- पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या जाचक अटी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यामुळे अनेक नागरी बँका अडचणीत येत आहेत. याबाबत सतत गाऱ्हाणी येत आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारकडून काय मदत करता येईल, याबाबत गठीत समितीने अभ्यास करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. तो अहवाल केंद्र शासनाला पाठवून मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही सहकार मंत्री वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!