छत्रपती संभाजीनगरवैजापूर
Trending

भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा, वैजापूरमधील मटका अड्डा उद्ध्वस्त ! पोलिसांच्या छापेमारीत १७ जण ताब्यात, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १७- पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून टाकलेल्या छापेमारीत १७ जण ताब्यात घेतले. वैजापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ऑनलाईन क्रिकेट बेटींग, मटका अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. सुमारे 7,57,000/- मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वैजापूर शहरातील परदेशी गल्लीतील राजपूत मढीजवळ ही कारवाई करण्यात आली.

दिनांक १४ / १० / २०२३ रोजी महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक, वैजापूर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वैजापूर शहरातील परदेशी गल्लीमध्ये विश्व चषकातील चालू असलेल्या भारत पाकिस्तान या क्रिकेट मॅचवर पैसे लावून सट्टा तसेच कल्याण मटका नावाचा अवैधरित्या जुगार अड्डा चालु आहे.

या माहितीवरून महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पथकासह जावून रात्री 20:00 वाजेच्या सुमारास परदेशी गल्लीतील राजपूत मढीजवळील गोकुळ राजपूत यांच्या घराजवळ सापळा लावला. यावेळी तिथे लोकांची बरीच संशयास्पद हालचाल दिसून आली असता गोकुळ राजपूत यांच्या घरी अचनाक छापा मारला असता तेथे गोकुळ कपूरसिंग राजपूत हा त्यांचे साथीदार आनंद मदनराज जैन या सह मोबाईल फोन व टॅब तसेच लॅपटॉपच्या मदतीने विश्वचषकातील चालू असलेल्या भारत पाकिस्थान या क्रिकेट सामान्यावरती पैसे लावून सट्टा खेळविताना मिळून आला.

तसेच त्याच्या घराचे पहिल्या व दुस-या मजल्यावर पाहणी केली असता तिथे काही जण हे कल्याण मटका नावाचा जुगार अवैधरित्या वेकायदेशीरपणे पैशावर खेळतांना व खेळवितांना मिळून आले आहेत. त्यांना ताब्यात घेवून विचारपूस करता त्यांनी त्यांची नावे पुढील प्रमाणे सांगितली आहेत.

यामध्ये आरोपी नामे १) गोकुळ कपुरसिंग राजपूत वय ३७ वर्षे (मुख्य सूत्रधार) २) आनंद मदनराज जैन वय ३४ वर्षे ३) दिंगबर फकीरचंद लोधे वय ४१ वर्षे ४) दिनेश संग्रामसिंग राजपूत वय ३४ वर्षे ७) रवि नामदेव ढगे वय ३९ वर्षे ६) संतोष नामदेव गायकवाड वय २७ वर्षे ७) शैलेश राजुसिंग राजपूत वय २३ वर्षे ८) गणेश हिरालाल राजपूत वय ३७ वर्षे ९) विठ्ठल कपूरचंद राजपूत वय ३५ वर्षे १०) सुरेश केशवराव गायकवाड वय ४३ वर्षे ११) सागर सुनील राऊत वय २७ वर्षे १२) क्षीतीज संतोष राजपूत वय १८ वर्षे १३) हिरालाल चंपालाल राजपूत वय ३७ वर्षे १४) विष्णू मोतीराम पराते वय ५५ वर्षे सर्व राहणार वैजापूर १५) तुषार लक्ष्मण नागपूरे वय ६० वर्षे रा. येवला, नाशिक, १६) राहुल भाऊसाहेब मोरे वय २५ वर्षे रा. कोपरगाव १७) सोमनाथ कडूवा गाढेकर वय २२ वर्षे रा. शिवूर ता. वैजापूर

यांच्या विरुध्द पोलीस ठाणे वैजापूर येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून 25 मोबाईल फोन, टॅब, व एक लॅपटॉप असा एकूण 7,57,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास वैजापूर पोलिस करित आहेत.

ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महक स्वामी, सहा. पोलीस अधीक्षक वैजापूर, पोलीस अंमलदार दिनेश गायकवाड, योगेश कदम, अमोल मोरे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!