महाराष्ट्र
Trending

भूमी अभिलेख कार्यालयात बोगस पीआर कार्ड, अनागोंदी ! जालना जिल्हाधिकाऱ्यांनी लगाम कसला, खादाड दोषी कर्मचाऱ्यांवर होणार फौजदारी !!

त्रिसदस्यीय समिती गठित

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी व बोगस पीआर आर्ड संदर्भात लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केलेल्या तक्रारीची दखल घेवून जालन्याचे निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी त्रिसदस्यीय समिती गठित केली असून ही समिती या सावळ्या गोंधळाची चौकशी करणार आहे. या समितीने याप्रकरणी निष्कर्ष काढून प्रसंगी फौजदारी कार्यवाही प्रस्तावित करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. यामुळे नियमबाह्य काम करणार्या कर्मचार्यांचे धाबे दणाणले असून लवकरच अशा कर्मचार्यांचा पर्दाफाश होणार आहे. तसा लगामच निवासी जिल्हाधिकारी यांनी कसला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी भूमी अभिलेख कार्यालयाकडून नियमाबाहय काल्पनीक आखीवपत्रिका तयार करण्यात येत असल्या बाबत तक्रार व्यक्त केल्या होत्या. तसेच लोकप्रतिनिधीकडून व्यक्त तक्रारीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख कार्यालयाकडून केवळ वैयक्तिक तक्रारी बाबत कार्यवाही करण्यात येते. मात्र मोठ्या प्रमाणात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार या आदेशाव्दारे नियमाबाहय काल्पनीक आखीवपत्रिका तयार करण्यात येत असलेल्या तक्रारी प्राप्त करून, त्यांची चौकशी करणेस्तव त्रिसदस्यीय समिती जिल्हाधिकारी यांचा आदेश दिनांक 04.11.2022 नुसार गठीत करण्यात आली होती.

आजरोजी सदर समितीतील अधिकारी बदलून गेलेले असल्यामुळे या आदेशाव्दारे खालील प्रमाणे सुधारीत त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. सरीता सुत्रावे (उपजिल्हाधिकारी,भूसंपादन जालना), अविनाश कांबळे (उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन, जालना) आणि कृष्णा सोपान शिंदे (जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख जालना)

या समितीने तक्रारीच्या अनुषंगाने आखिवपत्रिका काल्पनिक आहेत किंवा कसे? भूमी अभिलेख विभागाच्या अधिका-यांनी/ कर्मचा-यांनी बेकायदेशीर अथवा नियमबाहय पध्दतीने तयार केली किंवा कसे? याबाबीचे निष्कर्ष नोंदवून प्रकरणामध्ये कोणाविरुध्द फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याबाबत स्वंयस्पष्ट अहवाल या कार्यालयास सादर करावा. आवश्यक त्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्याची कारवाई ही भूमी अभिलेख विभागाच्या क्षेत्रिय अधिका-यांनी करावी.

तसेच ज्या प्रकरणामध्ये अधिकारी/कर्मचारी यांचा असद्हेतून नियमबाहय कृतामध्य सहभाग आढळून येईल त्यांचेविरुध्द कार्यालयीन शिस्तभंगाची कारवाई संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी प्रस्तावीत करावी. असे आदेश जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिले आहे. या आदेशाची प्रत 1. उपविभागीय अधिकारी (जालना/भोकरदन/परतुर / अंबड) जि. जालना.  जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख जालना, तहसिलदार ( जालना / बदनापूर/भोकरदन जाफराबाद/परतुर/मंठा/अंबड घनसावंगी) जि.जालना, तालुका अधिक्षक भूमी अभिलेख (जालना/बदनापूर/भोकरदन जाफराबाद/परतुर /मंठा /अंबड/ घनसावंगी) जि.जालना यांना पाठवण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!