छत्रपती संभाजीनगर
Trending

शिवाजीनगर ते देवळाई चौक मार्गावरील वाहतूक एक वर्ष पूर्णपणे बंद ! घाबरू नका, हे पर्यायी मार्ग वापरा, भूयारी मार्गाचे काम सुरु होणार !!

भूयारी मार्गाचे काम सुरु होणार, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एक वर्ष त्रास सोसावा लागणार

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – बीड बायपासजवळील शिवाजीनगर रेल्वे गेट वरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भूयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे शिवाजीनगर ते देवळाई चौक या मार्गावरील वाहतूक एक वर्ष पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी संभाजीनगर लाईव्हला दिली. हा मार्ग बंद राहणार असला तरी परिसरातील नागरिकांसाठी पर्यायी मार्गही वाहतूक शाखेने सूचवले आहे.

कार्यकारी अभियंता, जागतिक बँक प्रकल्प विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोड जवळ शिवाजीनगर रेल्वे गेट क्र. ५५ येथे भुयारी मार्गाचे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर बांधकामासाठी दिनांक १५/१०/२०२३ ते दिनांक १५/१०/२०२४ पर्यंत शिवाजीनगर ते देवळाई चौक या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची परवानगी देऊन इतर पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शहरातील शिवाजीनगर चौक पासून रेल्वेगेट मार्गे देवळाई चौक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीचे विनमय व नियमन केले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर चौक, रेल्वेगेट मार्गे देवळाई चौक कडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावर दिनांक १५/१०/२०२३ ते दिनांक १५/१०/२०२४ पर्यंत प्रवेश बंद राहील. नागरिकांना पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने सूचवला आहे तो खालीलप्रमाणे.

पर्यायी मार्ग
१) देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरुन जातील व येतील.
२) देवळाई चौक ते गोदावरी टी, एम. आय. टी., महानुभव आश्रम चौक, रेल्वे स्टेशन मार्गे जातील व येतील.
३) देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर भुयारी मार्गाने शहानुरमियाँ दर्गा चौककडे जातील व येतील.

४) देवळाई चौक ते गोदावरी टी, एम. आय. टी. चौक, महुनगर टी पॉईंट मार्गे उस्मानपुराकडे जातील व येतील
५) शिवाजीनगर, सुतगिरीणी चौक ते शहानुरमियाँ दर्गा चौक मार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरुन जातील व येतील.
६) शिवाजीनगर चौक, धरतीधन सोसायटी, गादीया विहार मार्गे शहानुरमियाँ दर्गा चौक मार्गे जातील व येतील. बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वाहतूक वळवतील किंवा मार्गात बदल करतील.

अधिसुचना ही पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागु राहणार नाही, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांनी दिली.

Back to top button
error: Content is protected !!