महाराष्ट्र
Trending

बीड गेवराई हायवेवर ट्रकने जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंत्यास चिरडले ! दोन महिन्यांपूर्वीच माजलागवात लागली होती नौकरी !!

बीड, दि. १६ – रस्त्याच्या कडेला मोटारसायकल थांबवून उभा असलेल्या युवकाला ट्रकने चिरडल्याची घटना बीड ते गेवराई नॅशनल हायवे रोड क्रमांक 52 वर राजणी शिवारात घडली. ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने युवकाचा मृत्यू झाला.

विकास लक्ष्मण क्षीरसागर (वय 28 वर्षे रा हिपरग्गा ता. औसा जि. लातूर) असे मृताचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वीच जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी 2 या पदावर तो सिचन शाखा क्रमांक -6 टाकरणवन केसापूरी कॅम्प माजलगाव येथे नोकरीस लागला होता. तो बीड येथे राहत होतो व तेथून तो माजलगाव येथे दररोज ये जा करित असे.

लक्ष्मण धोडीबा क्षीरसागर (वय 52 वर्षे, व्यवसाय नोकरी शिक्षक रा. हिपरग्गा ता. औसा महादेव नगर औसा रोड ह.मु. महादेव नगर औरा रोड लातूर) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते जि. प.प्राथमीक शाळा लामजना ता. औसा येथे शिक्षक म्हणून नोकरीस आहे.  लक्ष्मण धोडीबा क्षीरसागर यांना दोन मूले 1) विकास 2 ) सुहास आहेत. मूलगा विकास लक्ष्मण क्षीरसागर (वय 28 वर्षे) हा दोन महिन्यापूर्वी जलसंपदा विभागात सहायायक अभियंता श्रेणी 2 या पदावर सिचन शाखा क्रमांक -6 टाकरणवन केसापूरी कॅम्प माजलगाव येथे नोकरीस लागला होता. तो बीड येथे राहत होतो व तेथून तो माजलगाव येथे दररोज ये जा करित असे.

दिनांक 15/02/2023 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास लक्ष्मण धोडीबा क्षीरसागर हे लातूर येथे असताना त्यांना त्यांच्या गावातील संरपचाने फोन करून कळवले की, बीड येथील गेवराई पोलीसाचा फोन आला की विकास क्षीरसागर यांचा बीड ते गेवराई रोडवर राजणी शिवारात हायवे रोडवर आपघात झाला आहे व तो गंभीर जखमी आहे. अशी माहीती मिळाल्या वरून लक्ष्मण धोडीबा क्षीरसागर हे व त्यांचे इतर नातेवाईक साडेअकरा वाजता गेवराई येथे पोहोचले. सरकारी दवाखाना गेवराई येथे जावून त्यांनी मुला बाबत चौकशी केली असता तो मृत झाल्याचे कळाले.

त्याचा मृतदेह  पीएम रूममध्ये ठेवला असल्याने लक्ष्मण धोडीबा क्षीरसागर हे व त्यांच्या नातेवाईकाने मुलाचा मृतदेह पाहिला असता त्याचा कमरेपासूनचा भाग मास व हाडे ऊघडे पडलेली दिसली. चेहर्यास हाताला मार लागलेला दिसला. त्यानंत लक्ष्मण धोडीबा क्षीरसागर यांनी पो.स्टे. ला येवून चौकशी केली असता मुलास धडक देणारी ट्रक व चालक हा पोलिसाचे ताब्यात असल्याची माहिती मिळाली.

लक्ष्मण धोडीबा क्षीरसागर यांनी त्या ट्रक चालकास विचारपूस केली असता त्याने सांगितले की, दिनांक 15/02/2023 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एक जण मोटार सायकल रोडच्या बाजूस ऊभी करून उभा असताना ट्रकचा त्यास धक्का लागून तो पाठीमागचे टायर खाली आल्याने गंभीर जखमी झाला होता. मी ट्रक तेथेच ऊभा करून पोलिस स्टेशनला हजर झालो होतो, असे त्या ट्रकचालकाने सांगितले.

ट्रकचा क्रमांक KA-01 / AH- 6678 असा आहे. त्या चालकाने त्यांचे नाव भारती रवी (रा. SO रवी 1/89 कौडर स्ट्रीट कोनेरपट्टी तुरई तालूका, आलगापूरी त्रिचरापल्ली जिल्हा, तामीळनाडू) असे सांगितले. मृताचे वडील लक्ष्मण धोडीबा क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकावर गेवराई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!